
मुंबई ः निसर्गातल्या सर्वच गोष्टी चांगल्या नसतात आणि सर्वच रसायने वाईट नसतात. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय पदार्थांना (Organic Matters) समकक्ष असे तंत्रज्ञान आणायला हवे. ते आपण सहज तयार करू शकतो, असा विश्वास गोदरेज इंडस्ट्रीजचे (Godrej Industries) व्यवस्थापकीय संचालक नादीर गोदरेज (Nadir Godrej) यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला.
सरकारने युरियाची सबसिडी बंद करून त्याऐवजी कमी प्रदूषणकारी आणि उपयुक्त अशा नॅनो युरिया किंवा कोटेड युरिया यांना सबसिडी द्यावी, असेही ते म्हणाले. शेतीसाठी वापरला जाणारा काही युरिया वायाही जातो आणि त्याने नायट्रोजनचे प्रदूषणही जास्त होते.
त्यामुळे नॅनो युरिया किंवा कोटेड युरिया वापरल्यास नायट्रोजनचा कमी वापर होईल, पण तो पूर्णपणे पिकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे नायट्रोजनचे प्रदूषणही होणार नाही असेही त्यांनी दाखवून दिले. सेंद्रिय शेती चांगली म्हणवली जात असली तरी आपणही निसर्गाचे अनुकरण केले तर चांगले रसायनतज्ज्ञ बनू शकतो. सर्वच रसायनांना विरोध करू नये, आपण फक्त वाईट रसायनांच्या विरोधी असावे.
आपण चांगली रसायने जरूर तयार करू शकतो. निसर्गात मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी ह्या चांगल्या नसतात, उदाहरणार्थ सापाचे विष हानिकारक असते. तसेच सर्व कृत्रिम गोष्टी वाईट नसतात. सेंद्रिय गोष्टींच्या बरोबरीने त्याचे समकक्ष असे रासायनिक तंत्रज्ञान विकसित करावे, ते आपण जरूर करू शकतो असेही गोदरेज म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.