Tanpure factory : नगर जिल्हा सहकारी बँकेने घेतला तनपुरे कारखान्याचा ताबा

कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने, द्विपक्षीय करारानुसार कारवाई केली आहे.
Tanpure factory
Tanpure factory Agrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
राहुरी, जि. नगर ः नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Nagar District Co-operative Bank) अखेर तनपुरे साखर कारखान्याच्या (Tanpure factory) मालमत्तेचा ताबा घेतला. मंगळवारी (ता. १) बँकेतर्फे ३५ सुरक्षारक्षक कारखान्यावर तैनात करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने, द्विपक्षीय करारानुसार कारवाई केली आहे.

Tanpure factory
Cotton Rate : कापूस कधीपर्यंत दबावात असेल?

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेने वित्तपुरवठा केला आहे. २०१३ मध्ये कारखान्यावर ६० कोटींच्या कर्जाची थकबाकी होती. त्यानंतर बँकेने कारखान्याची चल, अचल मालमत्ता जप्तीची प्रक्रिया केली होती. २०१६ मध्ये कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले.

२०१७ मध्ये ९० कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठन होऊन, अकरा वर्षांसाठी मुद्दल व व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले. जिल्हा बँक व कारखाना व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय करार होऊन, बँकेने जप्त केलेली कारखान्याची मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना २०१७-१८ पासून सुरू झाला. २०१९-२० मध्ये ऊसटंचाईमुळे कारखाना बंद राहिला. मागील वर्षी ४ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप झाले.

Tanpure factory
Artificial intelligence : अचूक, तातडीच्या सल्ल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायदेशीर

विद्यमान कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून ४८ कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठन करताना ९० कोटींची मुद्दल व २१ कोटींचे व्याज असे १११ कोटी थकीत कर्ज ऑक्टोबर २०२२ अखेर बँकेला देणे बाकी राहिले आहे. बँकेने कर्जफेडीसाठी ५०० ऐवजी १०० रुपये प्रतिक्विंटल साखरेवरील टॅगिंग करावे. असा कारखाना व्यवस्थापनाचा आग्रह होता. परंतु त्यास बँकेने नकारघंटा वाजविली. त्यामुळे यंदाच्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम चालविण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दाखविली.

‘शर्तीनुसार कारखान्याचा ताबा’
कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेला मालमत्ता ताब्यात देण्याच्या सुपूर्दनाम्याची गरज नाही. गाळप हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने, द्विपक्षीय कराराचा भंग झाला आहे. करारातील अटी, शर्तीनुसार बँकेतर्फे कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केली आहे, असे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com