Nagpur Orange : नागपूर संत्रा हंगाम आला अंतिम टप्प्यात

अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्‍या नागपूर संत्र्यांचा पुणे बाजार समितीमधील हंगाम शेवटच्या टप्यात आला आहे. तर या हंगामाच्या समाप्तीनंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या संत्र्यांचा हंगाम सुरू होईल. त्याची प्रतिक्षा आहे.
Orange Market
Orange MarketAgrowon

पुणे ः अवकाळी पावसामुळे (Untimely Rain) अडचणीत आलेल्‍या नागपूर संत्र्यांचा (Nagpur Orange) पुणे बाजार समितीमधील हंगाम शेवटच्या टप्यात आला आहे. तर या हंगामाच्या समाप्तीनंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या संत्र्यांचा हंगाम सुरू होईल. त्याची प्रतिक्षा आहे.

Orange Market
Orange Producers : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची तिवसा तहसीलवर धडक

‘‘नागपूर संत्र्यांचा हंगाम साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. यावर्षी अवकाळी पावसामुळे माशीसह बुरशीची लागण झाल्याने ३० टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे. यामुळे पुणे बाजार समितीमध्ये देखील यावर्षी ३० टक्के कमी आवक झाली,’’ अशी माहिती संत्र्यांचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी दिली.

Orange Market
Orange Rate : संत्र्याचा गोडवा जगभर पोहोचवा

जाधव म्हणाले,‘‘ यावर्षी अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हंगामातील पहिल्या टप्प्यात चांगल्या दर्जाच्या संत्र्यांची आवक कमी राहिली. मात्र हंगामाच्या मध्यावर चांगली आवक झाली. नागपूर येथून संत्र्यांची लाकडाच्या पेटीसह, क्रेटमध्ये आवक होती.

Orange Market
Orange Disease : फळगळतीसाठी ४८ हजार हेक्टर क्षेत्र मदतीच्या कक्षेत

लाकडाच्या पेटीमधील संत्र्यांची विक्री डझननुसार तर क्रेटमधील संत्र्यांची विक्री वजनावर होते. रविवारी (ता.११) संत्र्यांची लाकडाच्या पेटीची सुमारे ३ हजार पेटी, तर क्रेटमधील संत्र्यांची सुमारे ५० टन आवक झाली. हा हंगाम आणखी १५ दिवस सुरू राहील आणि यानंतर राजस्थान आणि मध्यप्रदेशातून आवक सुरू होऊन, हा हंगाम पुढे दीड महिना राहील. राजस्थान, मध्यप्रदेशच्या संत्र्यांची चव गोडीला कमी आणि तुलनेने आंबट असते. तर दर साधारण ५० ते ७० रुपये प्रति किलो राहील.’’

...असे आहेत नागपूर संत्र्यांचे दर

८ ते १० डझन...१ हजार रुपये

११ ते १२ डझन...८०० रुपये

१४ डझन...७०० रुपये

२०० नग...६०० रुपये

प्रतिकिलो... ५० ते ७० रुपये

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com