
नागपूर ः प्रकल्प कामे, वातावरणातील बदलामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरलेली असून प्रदूषणात (Pollution) वाढ झालेली आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३३० पेक्षा अधिक नोंदविण्यात आलेला आहे. ‘एनएएक्यूएस’च्या निर्देशानुसार मुंबईची हवा अत्यंत खराब झालेली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. देशात दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर गणल्या जाते. त्या पाठोपाठ आता नागपूर देखील प्रदूषित शहर म्हणून नोंदवल्या जाणार आहे. शहराने प्रदूषणाच्या पातळीने टोक गाठले आहे.
नागपूरच्या हवेच्या गुणवत्तेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्युआय) हा २७६ खराब आणि ३३३ ते ३४६ अत्यंत खराब पातळीच्या जवळ पोहोचला आहे. हा प्रदूषणाचा उच्चांक असून यामुळे नागपुरकरांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात हा इंडेक्स १३८ आणि २७७ च्या दरम्यान होता. मात्र, त्यात आता वाढ झाली आहे. हा इंडेक्स सध्या खराब अत्यंत खराब या पातळीवर आहे. येत्या दोन दिवस हवेची गुणवत्ता ही खराब राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच बाहेर पडताना मास्क वापरावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. या सोबतच वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. यामुळे वातावरणातील धुलीकण वाढल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा हा सर्वात प्रदूषित होता. मात्र, आता डिसेंबरमध्ये देखील हवेचा एक्यूआय हा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता नागपूर देखील प्रदूषणात अचानक वाढ झालेली आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक
तारीख हवेची गुणवत्ता (एक्यूआय)
१ डिसेंबर ३३३
२ डिसेंबर ३२४
३ डिसेंबर ३४२
४ डिसेंबर ३३४
५ डिसेंबर ३२९
६ डिसेंबर २७६
हवा गुणवत्ता निर्देशांकाची स्थिती
५ ते ५० हवा स्वच्छ
५१ ते १०० समाधानकारक
१०१ ते २०० शुद्धता मध्यम
२०१ ते ३०० वाईट हवा
३०१ ते ४०० हवेची गुणवत्ता जास्त वाईट
४०१ ते ५०० आरोग्यासाठी अतिशय धोकादायक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.