घोडगंगाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मृत सभासदांची नावे

घोडगंगा किसान क्रांती पॅनेलकडून प्रारूप मतदार यादीवर हरकती
घोडगंगाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मृत सभासदांची नावे
Ghodganga Sugar ElectionAgrowon

पुणे : घोडगंगा साखर कारखान्यांच्या (Ghodganga Sugar Mill) संचालकांनी कारखान्याची प्रारूप मतदार यादी (Voter List Draft) जाहीर केली आहे. अनेक मृत सभासदांची (Dead Member) नावे या यादीत आहेत. मृतांची नावे कमी झाल्यानंतर त्यांच्या जागी वारसांची नोंद होणे आवश्यक आहे, असे असतानाही कारखाना प्रशासनाने मृत सभासदांचा सर्व्हे केला नाही. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हजारो सभासदांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जाचा विचार करावा, अन्यथा उच्च न्यायालयात याबाबत रिट याचिका दाखल केली जाईल, असा इशारा घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे (Ghodganga Kisan Kranti Panel) नेते दादा पाटील फराटे यांनी दिला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा किसान क्रांती पॅनेलने पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी पॅनेलची भूमिका मांडली. या वेळी कारखान्याचे संचालक व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी संचालक ॲड. सुरेश पलांडे, प्रकाश पवार, विजय फराटे उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेताना मृत सभासदांच्या वारसांच्या नोंदी करून त्यांना सभासदत्व द्यावे, अन्यथा हा मुद्दा घेऊन आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा घोडगंगा किसान क्रांती पॅनेलच्या नेत्यांनी दिला.

फराटे म्हणाले, की माजी मंत्री (स्व.) बापूसाहेब थिटे, ज्येष्ठ उद्योगपती (स्व.) रसिकलाल धारिवाल यांच्यासह अनेक मृत सभासदांची निवडणुकीसाठी नावे यादीत कायम आहेत. मृत सभासदांच्या वारसांच्या नोंदीचा विषय साखर संचालकांकडे सादर केल्यानंतर त्यांनी कारखाना प्रशासनाला दखल घेण्याचे व मृत सभासदांना नोटीस देऊन सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप त्यांनी केला.

कारखाना प्रशासन व सत्ताधारी वर्गाने मृत सभासदांच्या नोंदीचा विषय २५ वर्षे टाळला आहे, असा आरोप अॅड. पलांडे यांनी केला. सुनावणीसाठी सभासदांचे वारस हजर राहू नयेत, यासाठीच त्यांना नोटीस बजावण्याचे टाळत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केला आहे. कारखान्याच्या २३ मे २२ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर घोडगंगा किसान क्रांती पॅनेलच्या आवाहनानंतर सभासदांच्या वारसांनी मृत नोंद होऊन वारस नोंद होण्यासाठी हरकती दाखल केल्या आहेत.

कारखाना प्रशासनाने मतदार यादीवरील हरकतींबाबतच्या सुनावणीसाठीच्या नोटीस सभासदांना बजावण्यास नकार दिला आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणात हरकती आल्यानंतर साखर आयुक्तांनी दखल घेत कारखान्याला पत्र दिले. हरकतींवरील सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश दिले. मात्र, कारखाना प्रशासनाने त्यास नकार दिला आहे.
सुधीर फराटे, प्रमुख, शिवसेना, शिरूर तालुका

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com