नांदेड, किनवट, धर्माबादची पैसेवारी पन्नास पैशांवर

इतर तेरा तालुक्यांचा अंदाज पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाला आहे.
Market Rate
Market RateAgrowon

नांदेड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची (Kharip Season) नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी महसूल प्रशासनाने जाहीर केली. यात जिल्ह्यातील नांदेड, (Nanded Market Rate) किनवट, धर्माबाद तालुक्याची पैसेवारी पन्नास पैशांच्यावर जाहीर झाली आहे. तर इतर तेरा तालुक्यांचा अंदाज पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाला आहे.

Market Rate
Lasalgaon Market : लासलगाव बाजार समितीतील भुईकाटा बंद

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावांत आठ लाख ४४ हजार ३४७ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते.

Market Rate
Gold Market : सोने बाजारात २५ कोटींची उलाढाल

यापेकी यंदा सात लाख ९५ हजार ९९ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे. या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा नजर अंदाज ३१ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील नांदेड, किनवट, धर्माबाद तालुक्याची पैसेवारी पन्नास पैशांवर जाहीर झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com