Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

"या डबल इंजिनच्या सरकारवर लोकांना विश्वास आहे. तसंच मागील काळातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचा विकास रखडला होता. पण आता येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट होणार आहे."
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते विविध विकास कामांचे गुरुवारी (ता.१९) लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई मेट्रो (Mumbai Metro) २ व ७ तसेच दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) रुग्णालय, रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज टर्निमल आणि पीएम स्व निधी अशा विविध कामांचे उद्घाटन मोदी यांनी केले.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते मुंबईत तब्बल ३८ हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन झाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, शिंदे-भाजपा सरकारवर जनतेला विश्वास आहे. हे सरकार जनतेच्या पायाभूत सुविधांवर भर देईल. तसेच २०१४ पर्यंत मुंबईत फक्त ११ किलोमीटरपर्यंत मेट्रो होती.

मात्र शिंदे-भाजपचं सरकार आल्यानंतर मुंबईच्या विकासाला गती आली. राज्यातील डबल इंजिन सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे.

पुढे मोदी म्हणाले की, "या डबल इंजिनच्या सरकारवर लोकांना विश्वास आहे. तसंच मागील काळातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचा विकास रखडला होता. पण आता येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट होणार आहे."

Narendra Modi
Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत

मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. स्वागतानंतर नरेंद्र मोदींच्या मुंबईत ३८ हजार कोटी रुपयांचे लोकार्पण केले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com