महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आघाडीवर; ९८ टक्के काम पूर्ण

दूषित पाण्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने या वर्षीही जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल ॲपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आघाडीवर; ९८ टक्के काम पूर्ण
Swachha BharatAgrowon

नाशिक : दूषित पाण्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने या वर्षीही जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल ॲपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. ११ एप्रिलपासून सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे अभियान ३१ मेपर्यंत असून, जिल्ह्यातील सर्व ७ हजार ३५४ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करून त्याचे जिओ टॅग करण्यात येणार आहेत.

दरम्यान, रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात १०० टक्के पूर्ण करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भरवस, निरपण व भाम धरणात असलेल्या ७ पाणी स्रोतांचेही जिओ टॅग करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याचे सर्वाधिक काम झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ‘जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष’ हा उपक्रम राबवित असून, या कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात १०० टक्के पूर्ण करण्यात यावे, या बाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत.

या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकार्याने जिओफेन्सिंग मोबाइलॲपद्वारे गोळा करण्यात येत आहेत. तर गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली.

...अशी होते तपासणी

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सॅटेलाइटद्वारे टॅग करण्यासाठी शासनाने नागपूर येथील एमआरएसएसी या संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओफेन्सिंग हे एक मोबाइल अॅप असून, हे अॅप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात. स्रोतांच्या १० मीटर परिघात गेल्यावर अॅप सुरू करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करण्यात येऊन फोटो घेऊन नमुना घेण्यात येतो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले याची माहिती मिळते.

नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे हा हेतू

रासायनिक तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होत आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांला शुद्ध पाणी मिळावे हाच प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.

- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि. प. नाशिक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com