Grampanchyat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ठरली अव्वल

प्रस्थापितांना धक्का; भाजप दुसऱ्या स्थानावर
Grampanchyat Election
Grampanchyat ElectionAgrowon

नाशिक : जिल्ह्यातील १९६ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchyat Election) १९ सरपंच आणि ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मंगळवारी (ता. २०) झालेल्या मतमोजणीतून सर्वाधिक जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने वरचष्मा राखला. दुसऱ्या स्थानावर भारतीय जनता पक्ष, तिसऱ्या स्थानावर उद्धव ठाकरे यांचे समर्थक, तर चौथ्या स्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक राहिले असून अपक्षांनी पाचवे स्थान पटकावले आहे. काँग्रेसने आपले अस्तित्व राखत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एका ठिकाणी खाते उघडले.

Grampanchyat Election
Grampanchyat Election : ग्रामपंचायत निकालानंतर गुलालाची उधळण

ग्रामपंचायतींचे ५७९ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. १ हजार २७९ सदस्यांच्या जागांसाठी २ हजार ८९७, तर सरपंचांच्या १७७ जागांसाठी ५७७ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. त्यामध्ये मालेगाव तालुक्यात पालकमंत्री दादा भुसे आणि भाजपचे अद्वय हिरे यांच्या समर्थकांचे फिफ्टी-फिफ्टी यश मिळाल्याचे निकालातून पुढे आले. दाभाडीमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती, तर सौंदाणेमध्ये भाजपच्या मनीषा रत्नाकर पवार यांचे कुटुंबीयातील सदस्य, नांदगावमध्ये मूळडोंगरीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे समर्थक, नागापूरमध्ये माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल, नाशिकमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरराव धनवटे यांना पराभवाचा धक्का बसला. पेठमधील निरगुडे (क) येथे माजी खासदार सीताराम भोये यांच्या कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला आहे. नागापूरमध्ये श्री. पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांच्यासह पॅनलने बाजी मारली. .

Grampanchyat Election
Grampanchyat Election : राज्यशास्त्राचा संशोधक विद्यार्थी झाला सरपंच

चांदवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीतर्फे विजयाचा दावा करण्यात आला आहे. बागलाणमध्ये भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या समर्थकांपेक्षा अधिक जागा मिळवल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे केला जात आहे. निफाडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंतसह कसबे सुकेणे, पिंपळस, चांदोरीमध्ये विरोधकांनी बाजी मारली. पिंपळगावमध्ये भास्करराव बनकर यांनी आव्हान उभे केले. तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी दोन, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या समर्थकांनी तीन जागांवर यश मिळवले. दिंडोरी तालुक्यात ६ पैकी ठाकरे गटाला ३, राष्ट्रवादी २ तर भाजपला १ जागा मिळाली. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटेंपेक्षा उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंच्या समर्थकांनी आघाडी घेतली. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांचा दारुण पराभव झाला. भास्करराव बनकर यांचा ११३ मतांनी विजय मिळवित सरपंचपद काबीज केले.

निकालानंतर राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे

तालुका एकूण जागा शिंदे गट भाजप ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष

चांदवड ३५ -- १६ ३ १० ६ --

बागलाण ४१ -- १५ -- १९ ४ ३

येवला ७ -- ० ३ २ -- २

नांदगाव १५ १४ १ -- -- -- --

कळवण १६ १ १ -- १३ -- १(माकप)

त्र्यंबकेश्वर १ -- -- (ठाकरे आणि काँग्रेस १)

निफाड २० -- ३ ५ ८ -- ४

मालेगाव १३ ५ ५ -- १ -- २

नाशिक १४ २ २ ५ १ १ ३

देवळा १३ -- ११ -- १ -- १

दिंडोरी ६ -- १ २ ३ -- --

सिन्नर १२ -- -- ७ ४ -- १

(महाविकास)

पेठ १ -- -- -- -- -- १

इगतपुरी २ -- -- १ १ -- --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com