Honey Production : कांदा, द्राक्षांबरोबरच मधासाठीही नाशिकची ओळख व्हावी

निसर्ग जपला पाहिजे, कृषिक्रांती झाली पाहिजे. परागीभवनासाठी शेतकऱ्यांनी मधमाशीचा वापर केला तर कृषी उत्पादन दुप्पट मिळू शकते. याबाबत बसवंत मधमाशी केंद्रात जनजागृती केली जाते.
Honey Production
Honey Production Agrowon

Nashik Agriculture News : निसर्ग जपला पाहिजे, कृषिक्रांती (Agriculture Revolution) झाली पाहिजे. परागीभवनासाठी शेतकऱ्यांनी मधमाशीचा (Beekeeping) वापर केला तर कृषी उत्पादन (Agriculture Production) दुप्पट मिळू शकते. याबाबत बसवंत मधमाशी केंद्रात जनजागृती केली जाते.

शेतीला जोडव्यवसाय म्हणून ‘हनी बी क्लस्टर’ (Honey Bee Closter) स्थापन व्हायला हवेत. शेतकऱ्यांनी त्यासाठी पुढे यावे. कांदा, द्राक्षांबरोबरच मधासाठीही नाशिकची ओळख व्हावी, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे ‘सेवर निसर्गोत्सव’ आयोजित ‘मिलांज फळांचा महाराजा’ या प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या.

या प्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे, विजय पवार, यतीन कदम, महेश पाटील, सुनील पाटील, भागवत बोरस्ते, सतीश मोरे, बापू पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Honey Production
Honey bees : मधमाशा का आहेत महत्वाच्या?

डॉ. पवार म्हणाल्या, की बाजारपेठेची बदलती गरज लक्षात घेऊन शेतीमालाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. भारतातील पहिले मधमाशीपालन-पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याबरोबरच ‘क्लस्टर ऑफ एक्सलन्स होण्याच्या दृष्टीनेही केंद्र सरकारच्या योजनांतून ‘बसवंत गार्डन’ला मदत करण्याचे आश्वासन दिले.

Honey Production
Honey Production : मधनिर्मिती बनतेय जिल्ह्याची नवी ओळख

या बरोबरच कृषी आणि संलग्न क्षेत्राला सशक्त पर्याय देणारे, असे विविध प्रकल्प निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी सधन व सक्षम होण्यासाठी सुरू असलेले बसवंत गार्डनचे प्रयत्न गौरवास्पद तसेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ना. डॉ. पवार यांनी केले.

कृषी संस्कृतीचे जतन होण्यासाठी मधमाशीचे महत्त्व लक्षात घेऊन, तिचे संवर्धन व संरक्षण करण्याविषयीचे प्रबोधन या केंद्रात प्रामुख्याने केले जाते, असे ‘पूर्वा केमटेक’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रूपेश ठाकरे यांनी केले.

Honey Production
Honey Village : ‘मधाचे गाव’ समृद्ध गावाच्या दिशेने एक पाऊल

डॉ. पवार यांच्या हस्ते ‘मिलांज महाराजा’ स्पर्धेतील विजेते शेतकरी तसेच बसवंत लँडस्केप, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

या बक्षिसांसोबतच प्रत्येक फळाच्या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रत्येक गटात पाच उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली.

परीक्षक म्हणून ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड, जगताप यांनी काम पाहिले. स्पर्धेत राज्यभरातील शंभराहून अधिक फळ उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेतील विजेते :

द्राक्ष महाराजा-हिरवा गट...राजवर्धन मोहिते, (वडनेर भैरव, नाशिक)

द्राक्ष महाराजा-रंगीत गट...तेजस बोरस्ते (साकोरे मिग, नाशिक)

डाळिंब महाराजा...विकास डुकरे (जवळा, जि. कोल्हापूर)

बनाना किंग...प्रतीक पवार (निळवंडे, जि. नगर)

पपया किंग...शेखर पाटील (लिखारे, जि. नंदुरबार)

चिकू महाराजा...सागर दवंगे (पिशोर, जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com