Solar Power : छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘महावितरण’ला राष्ट्रीय पुरस्कार

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे हरित ऊर्जेविषयी आयोजित शिखर परिषदेत हरितऊर्जा क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वर्गवारीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Solar Power
Solar Power Agrowon

Solar Power Generation नाशिक : घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती (Solar Power Generation) पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती (Electricity Generation) करण्याच्या ‘रूफटॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘महावितरण’ला (Mahavitaran) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विजेता जाहीर केले आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी (ता. २४) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे हरित ऊर्जेविषयी आयोजित शिखर परिषदेत हरितऊर्जा क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वर्गवारीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Solar Power
Solar Energy : छतावरील सौरऊर्जा निर्मितीला वीज ग्राहकांची वाढती पसंती

माजी केंद्रीय ऊर्जा सचिव अनिल राजदान व ‘ईआरइडाए’चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. एस. पोपली यांच्या हस्ते ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी ‘रूफटॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणतर्फे पुरस्कार स्वीकारला.

Solar Power
Solar Pump : रत्नागिरीत ६८७ शेतकऱ्यांना सौरपंप वीज जोडण्या

‘महावितरण’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर ‘महावितरण’ला विकायची अशी ‘रूफटॉप सोलर’ योजना आहे. या योजनेला महावितरणच्या ग्राहकांची पसंती मिळाली आहे.

राज्यात बुधवारी (ता. २२) रूफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या ७९,५६४ झाली. त्यांच्याकडून १,३८७ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता गाठली गेली.

राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६-१७ या आर्थिक वर्षात घरगुती रूफटॉपचे केवळ १,०७४ ग्राहक होते. २० मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती क्षमता होती.

गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. १,३८७ मेगावॉटची क्षमता गाठली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ नंतर आतापर्यंत ३५६ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेची भर पडली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com