Medicinal Plants : औषधी वनस्पतीविषयी १४ ते १६ मार्चला राष्ट्रीय परिषद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १४ ते १६ मार्च २०२३ दरम्यान ‘वनस्पती विज्ञानातील नवीन प्रजाती आणि औषधी वनस्पती संशोधन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Medicinal Plant
Medicinal PlantAgrowon

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU, Pune) १४ ते १६ मार्च २०२३ दरम्यान ‘वनस्पती विज्ञानातील नवीन प्रजाती आणि औषधी वनस्पती संशोधन’ (Plant Reserach) या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे (National Conference) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Medicinal Plant
Agriculture Scheme : जळकोट तालुक्यात विविध योजनेतील ७० विहिरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातर्फे आणि आयुष मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून यामध्ये सशुल्क प्रवेश घेता येणार आहे. याचवेळी औषधी वनस्पती यांची खरेदी विक्री करणाऱ्या खरेदीविक्रीदारांचीही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Medicinal Plant
Medicinal Plant : राजूरला साकारले धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान

या बाबत माहिती देताना वनस्पतिशास्त्राचे प्रमुख डॉ. ए. बी. नदाफ यांनी सांगितले की, वनस्पतिशास्त्र विषयातील विविध संशोधन, जैव प्रजातींच्या विषयी मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे, यातील बौद्धिक संपदा आणि अधिकार, औषधी वनस्पतींची जपणूक आणि वाढ आदी बाबींवर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.

या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भूषण पटवर्धन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. प्रवीण वर्मा यांच्यासह हरियाना, बंगळुरू, मोहाली अशा विविध ठिकाणांहून अनेक नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यासाठीची अधिक माहिती तसेच नोंदणीसाठीची लिंक विद्यापीठाच्या संकेस्थळावर देण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com