‘बिद्री’चा देशपातळीवरील सन्मान गौरवास्पद ः शरद पवार

‘बिद्री’ साखर कारखान्याने आर्थिक नियोजन आणि उत्तम प्रशासन यांच्या जोरावर देशातील सहकारी संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे. राज्य पातळीवरील पुरस्कारांत या कारखान्याने सातत्याने आघाडी घेतली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याने (Bidri Sugar Factory) आर्थिक नियोजन आणि उत्तम प्रशासन यांच्या जोरावर देशातील सहकारी संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे. राज्य पातळीवरील पुरस्कारांत या कारखान्याने सातत्याने आघाडी घेतली आहे. आता राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून ‘बिद्री’ने देशातही आपला दबदबा निर्माण केला आहे. ‘बिद्री’चा देशपातळीवरील हा सन्मान राज्यासाठी गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतीवरील भार कमी करावा लागेल ः पवार

को - जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट को - जनरेशन पॉवर प्लांटचा पुरस्कार बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला होता.

मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात को - जन इंडियाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील व संचालक मंडळाला सुपूर्द करण्यात आला. या वेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विश्‍वजित कदम, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश जगदाळे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com