Sugarcane Crushing : ‘नॅचरल’ यंदा १२ लाख मे. टन उसाचे गाळप करणार : ठोंबरे

मागील हंगामाच्या तुलनेत उसाला समाधानकारक भाव देण्यात येईल, अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

शिराढोण ः नॅचरल उद्योग समूहाचे (Natural Group of Industries) या वर्षी १२ लाख मे. टन ऊसगाळपाचे (Sugarcane Harvesting) उद्दिष्ट असून, मागील हंगामाच्या तुलनेत उसाला समाधानकारक भाव देण्यात येईल, अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे (B.B. Thombre) यांनी दिली.

Sugarcane Crushing
Sugar Export : साखर निर्यातीसाठी खुले धोरणच सुरू ठेवावे

नॅचरल उद्योग समूहाच्या २१ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी, ता. २० मागील हंगामात सर्वाधिक ऊसपुरवठा करणारे ऊस उत्पादक शेतकरी अश्रूबा देवणे आणि सौ. अलंकावती देवणे दांपत्याच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. या वेळी संचालक पांडुरंग आवाड, राजपाल माने, अनिल ठोंबरे, एन. साई मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव रेड्डी, उपाध्यक्ष किशोर डाळे, प्रवर्तक विष्णू मोहिते उपस्थित होते.

नॅचरल उद्योगसमूहाच्या साखर कारखान्याची या वर्षी गाळपक्षमता वाढवून प्रति दिन ७५०० ते ८००० मेट्रिक टन करण्यात आली असून, ३१ मार्च २०२३ अखेर सभासद आणि बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येईल. या हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट आहे, असेही श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com