Sangli News: ‘नेचर केअर फर्टिलायझर्स’ शेतकऱ्यांना दिशादर्शक ः देशमुख

नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि.तर्फे कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, तसेच गेली ३५ वर्षांहून अधिक काळ कृषी क्षेत्रात योगदान देणारे व्रतस्थ कृषी संशोधक जयंत वामन बर्वे यांचा कृतज्ञता सोहळा आणि कंपनीचा रौप्य महोत्सवी सोहळा पार पडला.
Sangli News
Sangli News Agrowon

Sangli News: नावीन्यपूर्ण संशोधन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा ध्यास घेऊन नेचर केअर फर्टिलायझर्स (Nature Care Fertilizers) या सेंद्रिय खतनिर्मिती (Organic Fertilizer) कंपनीची स्थापना केली.

सेंद्रिय शेती (Organic farming) उत्पादने निर्मितीस चालना दिली. ही कंपनी शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Ex Minister MLA Amit Deshmukh) यांनी केले.

विटा (जि. सांगली) येथील नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि.तर्फे कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, तसेच गेली ३५ वर्षांहून अधिक काळ कृषी क्षेत्रात योगदान देणारे व्रतस्थ कृषी संशोधक जयंत वामन बर्वे यांचा कृतज्ञता सोहळा आणि कंपनीचा रौप्य महोत्सवी सोहळा पार पडला.

त्यावेळी देशमुख बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अमित देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते ‘बळिराम नांगर’ देऊन जयंत बर्वे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ‘नेचर केअर’चे व्यवस्थापकीय संचालक जयदेव बर्वे, बरवाज या सौंदर्यप्रसाधने बनविणाऱ्या कंपनीच्या संचालिका कामाक्षी बर्वे आदी उपस्थित होते.

या वर्षीपासून कंपनीतर्फे ‘नेचर केअर सन्मान’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. देशी बीज संकलन, संवर्धन व प्रसार प्रचार करणाऱ्या पाच संस्थांची निवड करून त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

Sangli News
Hirwali Khat : हिरवळीच्या खतांचा वापर करणं फायदेशीर ठरतं ?

अजय जाधव, खेडा, (जि. औरंगाबाद), नागेश व भारती स्वामी, शिवडे (जि. सातारा), धनाजीराव धोतरकर, आरळी बुद्रुक, (जि. उस्मानाबाद), रामसिंग वळवी, अक्कलकुवा (जि. नंदुरबार), सूर्यकांत कुंभार (जि. सिंधुदुर्ग) यांचा गौरव करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com