Swach Bharat
Swach BharatAgrowon

Swacha Sarvekshan : स्वच्छतेत नवी मुंबई अव्वल

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे संकेत

नवी मुंबई ः स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई (Navi Mumbai) शहराला आता देशात अव्वल येण्याचे वेध लागले आहेत. केंद्र सरकारतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ (Indian Swachta League ) स्पर्धेत नवी मुंबई शहराला पहिले पारितोषिक मिळण्याची शक्यता आहे.

Swach Bharat
Indian Navy : नौदलाची प्रतीकात्मक गुलामगिरी संपली

त्यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाल्याने महापालिकेतील अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.गेल्या वर्षी झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबई शहराला देशात चौथा क्रमांक मिळाला होता;

Swach Bharat
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत तीन लाख दावे दाखल

तर १० ते ४० लाख लोकसंख्येच्या गटातून नवी मुंबई देशात पहिली आली होती; मात्र एवढी तयारी करूनही नवी मुंबईला पहिल्या क्रमांकाने हुलकावणी दिल्याने यंदा २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनंतर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेच्या घोषणेच्या आधीपासूनच अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात पालिकेने स्पर्धेची तयारी सुरू केली होती.

Swach Bharat
Crop Damage : वंचित नुकसानग्रस्तांना ७५५ कोटींची मदत

नागरिकांचा सहभाग, अभिप्राय आणि १०० टक्के कचरा वर्गीकरणाबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तसेच बांगर यांच्या आदेशानुसार सिडकोच्या नागरी वसाहती, गावठाण, झोपडपट्ट्या, खासगी वसाहती, मोठ्या आकाराची गृहसंकुले, व्यावसायिक संकुले आदी ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणीवर भर दिला आहे. ‘इंडियन स्वच्छता लीग’ला प्रतिसाद केंद्र सरकारकने राबवलेल्या इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत देशभरातील १८०० शहरे सहभागी झाली होती.

नवी मुंबई शहरातर्फे ‘इको नाईट्स’ हा संघ प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांच्या संघनायकाच्या भूमिकेतून सहभागी झाला होता. या स्पर्धेत सहभागी होताना महापालिकेतर्फे भव्य रॅली, साडेसात किलोमीटर अंतरापर्यंत तिरंगा घेऊन विश्वविक्रमी मानवी साखळी, तृतीयपंथीयांचा सहभाग, २५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

दिल्लीवारीसाठी अधिकाऱ्यांची तयारी

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या ३० ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आले आहे. तसेच याच स्टेडियमवर १ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com