Development of Temple : नवनाथ देवस्थानांचा विकास होणार

राज्यात नवनाथभक्तांची मोठी संख्या आहे. नवनाथाची बहुसंख्य समाधिस्थळे नगर व बीडमध्ये आहेत. या नवनाथ देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर येणाऱ्या भाविकांसाठी विविध मूलभूत अत्यावश्यक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.
Development of Temple
Development of TempleAgrowon

नगर : देशभरात नवनाथांचा मोठा भक्तवर्ग आहे. राज्य सरकारमार्फत (State Government) ज्याप्रमाणे अष्टविनायक देवस्थानांचा विकास करण्यात आला, त्याच धर्तीवर राज्यातील नवनाथ देवस्थानांचा विकास व्हावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Tourism Minister Mangalprabhat Lodha) यांना सादर केला आहे.

मंत्री लोढा यांनी मंत्रालयातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्‍य प्रणालीद्वारे मंगळवारी (ता. ११) बैठक घेतली. त्यांच्यासमवेत पर्यटन विभागाच्या सचिव आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. राज्यात नवनाथभक्तांची मोठी संख्या आहे.

नवनाथाची बहुसंख्य समाधिस्थळे नगर व बीडमध्ये आहेत. या नवनाथ देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर येणाऱ्या भाविकांसाठी विविध मूलभूत अत्यावश्यक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.

अष्टविनायक देवस्थानांचा विकास राज्य सरकारमार्फत ज्याप्रमाणे हाती घेण्यात आला आहे, त्या धर्तीवर राज्यातील नवनाथ देवस्थानांचा विकास व्हावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी भोसले यांनी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सादर केला.

Development of Temple
Nagar Cow Death : शासन शेतकऱ्याला योग्य ती मदत करणार

या बैठकीत त्या त्या जिल्ह्यातील पर्यटनविषयक प्रस्तावांबाबत विचारणा करण्यात आली. सहा दिवसांच्या आत सर्व जिल्हा यंत्रणांनी आपल्याकडील प्रस्ताव परिपूर्ण स्वरूपात सादर करावेत.

त्यावर पुन्हा येत्या सहा दिवसांत पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात येईल, असे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्पष्ट करण्यात आले.

मंत्री लोढा म्हणाले, की सरकार प्रशासनाच्या माध्यमातूनच जनतेपर्यंत पोहोचते. विकासविषयक योजनांच्या अंमलबजावणीत सर्वांनी सतर्क राहून योगदान द्यावे. राज्य सरकारने वार्षिक महोत्सव दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.

Development of Temple
God Rate : लग्नसराईमुळे सोने तेजाळले

नवनाथ देवस्थाने

गोरक्षनाथ ः मांजरसुंबा आणि

कानिफनाथ ः मढी (जि.नगर)

मच्छिंद्रनाथ ः मायंबा,

जालिंदरनाथ ः येवलवाडी,

गहिनीनाथ ःचिंचोली (जि. बीड)

रेवणनाथ ः विटे (जि. सांगली)

नागनाथ ः वडवळ (जि. लातूर)

भर्तरीनाथ तथा भर्तृहरीनाथ ः हरंगूळ (जि. परभणी)

बीड जिल्ह्यात तीन, नगर जिल्ह्यात दोन, अशी नवनाथांची देवस्थाने आहेत. या देवस्थानांना दर्शन आणि भेटीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी पर्यटन विभागामार्फत देवस्थानांचा विकास करतानाच, भाविकांना सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com