Pune APMC Election : राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला एक जागेवर बोळवण

राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समिती निवडणुकीसाठी मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दोन मेळावे घेत निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
Pune APMC | APMC Election
Pune APMC | APMC ElectionAgrowon

Pune News पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) आलबेल नसल्याचे समोर आले आहे. बाजार समितीवर कायमच वर्चस्व राहिलेल्या राष्ट्रवादीने (NCP) काँग्रेसला एकही जागा दिलेली नसून, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) केवळ एकच जागा देऊन बोळवण केल्याचे समोर आले आहे. (Pune APMC)

राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समिती निवडणुकीसाठी मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दोन मेळावे घेत निवडणुकीत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दोनच दिवसांपूर्वी १८ पैकी १५ उमेदवारांची यादी जाहीर केली.

Pune APMC | APMC Election
Pune APMC News : बाजार समिती घटकांकडून आज काळे कपडे घालून निषेध

यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघातून शिवसेनेच्या (ठाकरे गट) रामकृष्ण सातव (वाघोली) यांचा समावेश करण्यात आला. मात्र काँग्रेसकडून एकाही उमेदवाराची घोषणा न केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय जगताप हे जपान दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचेही बाजार समितीच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.

Pune APMC | APMC Election
Nandurbar APMC Election Update : नंदुरबारात बाजार समिती निवडणुकीत चुरस वाढली

अडते, व्यापारी गटाची नावे जाहीर नाही

अडते, व्यापारी गटातून दोन जागा आहेत. या दोन जागांसाठी राष्ट्रवादीच्या ६ निष्ठावान नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी ज्येष्ठ संचालक विलास भुजबळ, गणेश घुले यांच्यासह अडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले, संचालक सौरभ कुंजीर, शिवाजी सूर्यवंशी, अनिल घुले हे लढण्यावर ठाम असल्याने पक्षाची अडचण वाढली आहे.

यामुळे या गटात अधिकृत उमेदवारी जाहीर न करण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची चर्चा आहे. तर २० एप्रिलनंतरच्या उमेदवारी अर्ज माघारीनंतर या गटातील चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजप -शिवसेनेचे अद्याप पॅनेल नाही

भाजप शिवसेनेची भिस्त ही राष्ट्रवादीतील आयात उमेदवारांवर असून, त्यांची अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. त्यांची यादी २० एप्रिलनंतर स्पष्ट होईल अशी चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com