कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागात समन्वयाची गरज

कृषी आयुक्त धीरजकुमार ः पशुसंवर्धन आयुक्तालयात बैठक
कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागात समन्वयाची गरज
Dheeraj KumarAgrowon

पुणे ः हवामान आणि मॉन्सूनच्या (Monsoon) अनिश्‍चिततेमुळे शेती क्षेत्रासमोर (Agriculture Sector) मोठी आव्हाने असताना, अनेक संशोधने आणि योजना (Agriculture Scheme) शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाहीत हे दुर्दैव आहे. कृषी विद्यापीठे (Agriculture University) आणि कृषी विभागामध्ये संवादहिनता असल्याने योजना आणि संशोधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी भविष्यात कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागामध्ये परस्पर समन्वय आणि विश्‍वासाने काम करण्यासाठी कृती आराखड्याची गरज आहे, असे मत कृषी आयुक्त धीरजकुमार (Dheeraj Kumar) यांनी व्यक्त केले.

विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक बुधवारी (ता. ८) पशुसंवर्धन आयुक्तालयातील सभागृहात झाली. बैठकीला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांककुमार पाटील, कृषी आयुक्त धीरजकुमार, पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रसाद सिंग, आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, मृद्संधारण संचालक नारायण शिसोदे, सहयोगी संशोधक संचालक डॉ. सुपे आदी उपस्थित होते.

कृषी आयुक्त धीरजकुमार म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठांद्वारे विविध वाणांचे संशोधन होते. मात्र त्याचा प्रसार न झाल्याने ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाने समन्वय आणि विश्‍वासाने योजना आणि संशोधने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र देशाचे कृषी उत्पन्नामध्ये २७ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. हे उद्दिष्ट आणखी वाढविण्याची गरज आहे. यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागामध्ये भरपूर समन्वयासाठी कृती आराखड्याची गरज आहे. विद्यापीठांनी सादर केलेल्या शिफारशी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या शिफारशी थेट बांधावर वेगाने जशाच्या तशा पोहोचविण्यासाठी कृषी सहायकांना आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासारखे प्रशिक्षण कार्यक्रम ‘वनामती’द्वारे राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहे.’’

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘शेतीसमोर हवामान बदल आणि जमीन सुपीकतेचे मोठे आव्हान आहे. या आव्हान बरोबरच मात्र आता कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाच्या संशोधनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.’’

कृषी विद्यापीठे जैवतंत्रज्ञान संशोधनात मागे

कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी निधीच्या कमतरतेमुळे जैवतंत्रज्ञान संशोधनात विद्यापीठे मागे आहेत. आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी कृषी विभागाने केल्यास, जैवतंत्रज्ञानावर मोठी संशोधने कृषी विद्यापीठात होतील, अशी अपेक्षा कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केली.

कृषी विभाग केवळ विविध अनुदान वाटणारा नाही तर शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन, शिफारशींचे ज्ञान बांधापर्यंत वाटणारा पाहिजे. यासाठी कृषी विद्यापाठांनी केलेल्या विविध शिफारशी वेगाने बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी आयएएसच्या धर्तीवर कृषी सहायकांना वनामतीमध्ये दरवर्षी विविध प्रशिक्षणे देण्याचा विचार कृषी विभाग करत आहे.’’
धीरजकुमार, कृषी आयुक्त

१० वाण, १ शेती यंत्र आणि ५८ शिफारशी सादर

कृषी विद्यापीठाने गेल्या वर्षी सादर केलेली १० वाण, १ शेती यंत्र आणि ५८ शिफारशी आजच्या बैठकीत कृषी विभागाकडे सुपूर्त केल्या. याचे सादरीकरण कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com