Pest Management : कीड व्यवस्थापनासाठी आधुनिक शेतीची गरज ः धुमाळ

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी आधुनिक शेतीची गरज असून, सर्व शेतकऱ्यांनी ती अवलंबात आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिकचे कृषितज्ज्ञ मिथून धुमाळ यांनी केले.
Pest Management
Pest ManagementAgrowon

ओतूर, जि. पुणे ः एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी (Integrated Pest Management) आधुनिक शेतीची (Modern Agriculture) गरज असून, सर्व शेतकऱ्यांनी ती अवलंबात आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिकचे कृषितज्ज्ञ मिथून धुमाळ यांनी केले.

उदापूर (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिकच्या वतीने खरीप हंगाम २०२२-२३ साठी मका पिकावरील शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत धुमाळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Pest Management
Pest Management: योग्य कीड-रोग व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात वाढ

या वेळी कार्यशाळेला सरपंच सचिन आंबाडेकर, उपसरपंच जनाबाई अमूप, ग्रामसेवक प्रशांत जोरवर, तसेच, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

धुमाळ म्हणाले, ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या अशास्त्रीय व वारेमाप वापरामुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चातही खूप वाढ झालेली आहे. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना वेळीच बाहेर पडायचे असेल तर कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अंगीकार करणे आजच्या काळात गरजेचे झाले आहे. यासाठी यांत्रिक, जैविक व रासायनिक या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होतेच, त्याचबरोबर केवळ रासायनिक कीटकनाशकांवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये बचत होते आणि विषविरहित उत्पादन मिळू शकते.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com