Cooperative Banking: सहकारी बॅंकांनी स्वतःचे भांडवल उभारण्यावर लक्ष द्यावेः सतीश मराठे

सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे आगामी काळात मोठी आव्हाने आहेत. याचा सामना करण्यासाठी व्यवस्थापन, नवे तंत्रज्ञान, स्वभांडवलाची सक्षमता व मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.
Cooperative Conference
Cooperative Conference Agrowon

Sakal Cooperation Conclave पुणे: सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे (Cooperative Bank) आगामी काळात मोठी आव्हाने आहेत. याचा सामना करण्यासाठी व्यवस्थापन, नवे तंत्रज्ञान (New Technology), स्वभांडवलाची सक्षमता व मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.

या घटकांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपेक्षित बदल करावेत, असे आवाहन रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे (Satish Marathe) यांनी येथे केले. सहकार महापरिषदेत ‘सहकारी बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते.

Cooperative Conference
Cooperative Conference : विलीनीकरणापेक्षा सहकारी बॅंका सक्षम करा

श्री. मराठे म्हणाले, की सहकार क्षेत्रातील बँकांपुढे आव्हाने वाढली आहेत. व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे अपरिहार्य आहे. बँकांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा अपेक्षित असली, तरी बँकांना वैयक्तिक पातळीवर अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत.

Cooperative Conference
Cooperative Conference : आगामी दशक सहकाराचेच

यासाठी संस्थेच्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन स्व भांडवल उभारण्याची गरज आहे. जर तोटा झाला तर स्वतःचे भांडवल वापरून बँक तोट्यापासून वाचवणे गरजेचे बनते.

बँका एनपीएवर आधारित पुढील नियोजन ठरवतात. त्याऐवजी उपलब्ध स्रोतांच्या आधारे नियोजन केल्यास बँका तोट्यात जाण्यापासून वाचतील.

स्वतःचे भांडवल गृहीत धरून संस्थेच्या प्रगतीसाठी कसे व्यवस्थापन करता येईल याबाबत एकत्रित प्रयत्न अपेक्षित आहेत. सातत्याने या क्षेत्रातील बदल स्वीकारून तो व्यवस्थापनात आणणारे कर्मचारी महत्त्वाचे आहेत.

प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी येथून पुढील काळामध्ये संस्थांना भरभराटीस आणू शकतात. व्यवहारांचे डिजिटलायजेशन ही काळाची गरज बनली आहे. येत्या काही वर्षांत ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com