
नगर ः ‘‘जिल्ह्यातील सहकाराच्या विकासात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील कामधेनू संस्था (kamdhenu Institute) आहे. सहकारी संस्थामधील पदाधिकारी, संचालक, सेवक यांना सहकारी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे,’’ असे मत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (District Central Co-operative Bank) मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी व्यक्त केले.
भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा सहकारी मंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील सहकार प्रशिक्षक प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक जिल्हा सहकार विकास अधिकारी व सहकार शिक्षणाधिकारी यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी (ता. ६) प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वर्पे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मुख्याधिकारी मंगल भाईर यांनी कार्यक्रम घेण्यामागील हेतू व महाराष्ट्र सहकारी संघाचे अधिकारी यांनी काळाबरोबर अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकार संघाचे बोर्ड सचिव एस. एस. बोडके यांनी प्रास्ताविक केले.
या उपक्रमांतर्गत व्याख्याते सुनील शेटे, के. उदयशंकर यांची व्याख्याने होणार आहेत. कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक उपस्थित आहे. आभार जिल्हा सहकार विकास अधिकारी बाळासाहेब बडदे यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.