शेतकरी-संशोधक संस्थांतील दरी दूर करण्याची गरज

देशातील मातीच्या आरोग्याचा अभ्यास करणारी संस्था नागपुरात आहे. या विषयी बहुतांश शेतकऱ्यांनाच काय मलाही माहिती नव्हते. अशा अनेक संस्थांच्या संशोधनात्मक कामाविषयी घडते.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

नागपूर ः ‘‘शेतमालाची उत्पादकता (Agriculture Produce Productivity) वाढविण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान (Agriculture Technology) उपलब्ध असल्याचा दावा प्रत्येक व्यासपीठावर संशोधक संस्था करतात. तर शेतकऱ्यांमध्ये मात्र या संस्था पांढरा हत्ती असल्याची भावना आहे. याचा अर्थ सामान्य शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचत नाही, असा होतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने पुढाकार घेत शेतकरी आणि संशोधक संस्थांमधील ही दरी दूर करण्यासाठी पूरक प्रयत्न करावेत,’’ असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला.

Nitin Gadkari
Cotton : नव्या कापसाला १२ हजाराचा दर ?

भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गतच्या मृद सर्व्हेक्षण व जमीन नियोजन संस्थेच्या ४६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात गडकरी शनिवारी (ता.२७) बोलत होते. परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, उपसंचालक डॉ. एस.के. चौधरी, ‘एनबीएसस’चे संचालक डॉ. बि. एस. व्दिवेदी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते.

Nitin Gadkari
Soybean : राज्यातील पंधरा टक्के सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’

गडकरी म्हणाले, ‘‘मातीचे आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे. मला या विषयी माहिती नसल्याने लागवडयोग्य नसलेल्या जमिनीत संत्रा लावला आणि उत्पादन झाले नाही. देशातील मातीच्या आरोग्याचा अभ्यास करणारी संस्था नागपुरात आहे. या विषयी बहुतांश शेतकऱ्यांनाच काय मलाही माहिती नव्हते. अशा अनेक संस्थांच्या संशोधनात्मक कामाविषयी घडते. या संस्था आपल्यास्तरावर काम करत असतील. परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी बदलाचे धोरण त्यांनी काळानुरुप स्वीकारले पाहिजे. त्यासाठी ज्या भागात जी भाषा आहे, त्या भाषेत माहितीपत्रक, तंत्रज्ञानाची माहिती देणारे छायाचित्र, व्हिडिओ अशा बाबींवर भर देण्याची गरज आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेनेच त्यासाठी पुढाकार घ्यावा.’’

‘‘स्थानिक भाषांमध्ये असलेले प्रचार साहित्य, छायाचित्र व व्हिडिओचा वापर करून तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. त्याशिवाय या संस्थांचा कोणताच उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही,’’ असेही गडकरी म्हणाले. डॉ. व्दिवेदी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. पाठक यांनी ‘आयसीएआर’च्या प्रस्तावित उपक्रमांविषयी सांगितले. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, कापूस अभियांत्रिकी संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता उपस्थित होत्या.

संशोधकांचे व्हावे मूल्यमापन

‘‘संशोधक संस्थांमधील तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतात. त्यानंतरही त्यांच्याकडून सातव्या, आठव्या वेतन आयोगाची मागणी होत राहते. परंतु, त्यांनी त्यांच्या कामाप्रती बांधीलकी जपत शेतकरी हितासाठी संशोधनात्मकस्तरावर काय दिले? याचे मूल्यमापन कसे होते. याची माहितीच सर्वसामान्यांना नाही. त्यामुळेच शेतकरी आणि शास्त्रज्ञांमधील दरी आणखीच विस्तारली आहे. आपला वेतन आयोग आणि पगाराला विरोध नसला तरी हे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे व्हावे,’’ असेही परखड मत गडकरी यांनी व्यक्त केले.

‘पंतप्रधानही असमाधानी’

‘‘देशातील शेती संशोधन संस्थांची उपयोगिता समोर येत नसल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी समाधानी नाहीत. त्यांनी उपयोगिता अभ्यासात थेट दोन- तीन संस्थांचे एकत्रीकरण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे संशोधकांनी आपली जबाबदारी ओळखत अधिक जोमाने काम केले पाहिजे,’’ या शब्दांत गडकरी यांनी संशोधकांचे कान टोचले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com