Rain : संतत धार पावसामुळे धरणांत नव्याने २४४ टीएमसी पाणीसाठा

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात धुव्वाधार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असल्याने धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.
Total water storage in dam, Monsoon news updates
Total water storage in dam, Monsoon news updates

पुणे ः गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात धुव्वाधार पाऊस (Heavy Rain In Maharashtra) पडत आहे. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असल्याने धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ (Dam Water Level Increased) होत आहे. मागील वीस दिवसांत नव्याने तब्बल २४४ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाल्याने राज्यातील पाणीसाठा (Water Storage) ५६१ टीएमसीवर गेला आहे. सध्या राज्यातील धरणांत सरासरी ३७ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. तर गोसी खुर्द, खडकवासला, इरई अशी धरणे भरत आल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून काही प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे.(Monsoon News updates)

Total water storage in dam, Monsoon news updates
Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडलामध्ये पाऊस

यंदा पूर्वमोसमी पावसाची दडी व जून महिन्यात मॉन्सूनचा अभाव यामुळे राज्यात सरासरी असलेल्या २०९.८ मिलिमीटरपैकी अवघा १४७.५ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला होता. यातही मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तूट दिसून आल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी होत नसल्याचे स्थिती होती. त्यामुळे राज्यात २१ जूनपर्यंत राज्यातील एकूण तीन हजार २६७ प्रकल्पामध्ये सुमारे ३१७ टीएमसी (९००७.०९ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी २२.०९ टक्के पाणीसाठा झाला होता. परंतु ३० जूननंतर पाऊस सक्रिय झाल्याने कोकण, मराठवाडा, विदर्भात व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, बाघ, वैनगंगा, वणा, मुठा, भीमा, कोयना, कृष्णा, पंचगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Total water storage in dam, Monsoon news updates
Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

गेल्या वर्षी याच काळात धरणांत २८ टक्के एवढा पाणीसाठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दहा टक्केने वाढ झाली आहे. सध्या कोकण विभागातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोकणातील १७६ धरणांत ८२.११ टीएमसी म्हणजेच सरासरी ६६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये भातसा, सुर्याधामनी, मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, मध्य वैतरणा, बारावे या धरणांत ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहे. नाशिक विभागातील ५७१ धरणांत ८७.१६ टीएमसी म्हणजेच ४१ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये दारणा, गंगापूर, भंडारदरा, मुळा, गिरणा, हतनूर, वाघूर या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून हतनूर, मुळा वगळता उर्वरित धरणांत ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

पुणे विभागातील ७२६ धरणांत १८२ टीएमसी म्हणजेच ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या विभागातील धरणांत २६ टक्के पाणीसाठा होता. यंदा चांगलीच वाढ झाली आहे. विभागातील कोयना, राधानगरी, दूधगंगा, उजनी, भाटघर, पवना, पानशेत, खडकवासला, घोड या धरणांतील पाण्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात कमीअधिक पाऊस असल्याने ९६४ धरणांत ८२ टीएमसी म्हणजेच ३१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, नाशिक विभागातून काही प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणांतील पाण्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. पूर्णा येलदरीच्या पाणीसाठा ९९ टक्के झाला असून उर्वरित धरणांत कमी पाणीसाठा आहे.

अमरावती विभागातील ४४६ धरणांत ५९.५६ टीएमसी म्हणजेच ४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणांत ३४ टक्के पाणीसाठा होता. यंदा यामध्ये ऊर्ध्व वर्धा ६३ टक्के, अरुणावती २७, इसापूर ५८, बेंबळा ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील ३८४ धरणांत ६७.४५ टीएमसी म्हणजेच ४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये इरई धरणांत ९७ टक्के, पंच तोडलाडोह ६२ टक्के झाला असून इतर धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये) :

प्रकल्प ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के

मोठे प्रकल्प -- १४१ --- ४४३.४५ --- ४३

मध्यम प्रकल्प -- २५८ --- ७५.३१ -- ३९

लघु प्रकल्प --- २८६८ ---४२.०८ --- १८

एकूण --- ३,२६७ -- ५६०.८७ --- ३८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com