Jalgaon DCC Bank : जळगाव जिल्हा बँकेत लवकरच नवे अध्यक्ष

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीला ठरल्यानुसार एक वर्ष पूर्ण झाल्याने संचालकांनी अध्यक्ष बदल करायचे ठरविले आहे, त्यानुसार नवे अध्यक्ष निवडले जाणार आहेत.
Jalgaon DCC Bank
Jalgaon DCC BankAgrowon

Jalgaon DCC Bank News जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपद (Chairman Election) निवडीला ठरल्यानुसार एक वर्ष पूर्ण झाल्याने संचालकांनी अध्यक्ष बदल करायचे ठरविले आहे, त्यानुसार नवे अध्यक्ष निवडले जाणार आहेत.

नव्या निवडणुकीचा (Election Jalgaon) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल. याबाबतचा निर्णय संचालकांनी एकमताने घेतला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही त्याला सहमती दर्शविली असून उपाध्यक्षपदाबाबत शिवसेना (शिंदे गट) निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बँकेच्या अध्यक्षपदाची एक वर्षाची मुदत पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्यासाठी खडसे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बैठक झाली.

अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्‍यामकांत सोनवणे, संचालक प्रदीप देशमुख, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, घन:श्‍याम अग्रवाल, शैलजा निकम, आमदार किशोर पाटील, ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, प्रताप हरी पाटील, जनाबाई महाजन, सुनील महाजन आदी उपस्थित होते.

Jalgaon DCC Bank
Jalgaon News: खानदेशात मका आवक अल्प

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, की बँकेची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्षे अध्यक्षपद, एक वर्षे शिवसेनेला आणि एक वर्षे काँग्रेसकडे अध्यक्षपद असेल. उपाध्यक्षपद दोन वर्षे शिवसेनेकडे, दोन वर्षे काँग्रेसकडे तर एक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील, असे ठरले होते,

त्यानुसार दोन्ही पदांसाठी एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे नियमाप्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

Jalgaon DCC Bank
Jalgaon News : जळगावच्या विकासासाठी अडीचशे कोटी वाढीव द्या

पालकमंत्र्यांचीही सहमती

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपल्यामुळे नवीन निवड करण्याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी सभागृहातून चर्चा केली, त्यांनीही त्याला सहमती दर्शविली असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

उपाध्यक्षपद शिवसेनेकडे (शिंदे गट) असल्यामुळे उपाध्यक्षपदाबाबतचा निर्णय त्या पक्षाच्या संचालकांनीच घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी अध्यक्ष बदलाचा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com