कोरोनाविरुद्ध खबरदारीचे केंद्राचे नव्याने दिशानिर्देश

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत चालल्याने केंद्राने राज्य सरकारांना खबरदारी घेण्याचे दिशानिर्देश नव्याने जारी केले आहेत.
कोरोनाविरुद्ध खबरदारीचे केंद्राचे नव्याने दिशानिर्देश

नवी दिल्ली ः कोरोनाचे रुग्ण (Corona Cases) पुन्हा वाढत चालल्याने केंद्राने राज्य सरकारांना खबरदारी घेण्याचे दिशानिर्देश नव्याने (Corona Guidelines) जारी केले आहेत. मागील २४ तासांत १३,३१३ नव्या रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णसंख्या (Active Corona Patient) ८३ हजारांच्या पुढे पोहोचल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) हे पाऊल उचलले आहे.

बुधवारपासून ३८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून मृतांचा अधिकृत आकडा साडेपाच लाखांच्या घरात पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया गुरुवारी दुपारी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर राज्यांच्या आरोग्य सचिव व आरोग्य मंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करतील. मागील आठवडाभरापासून देशात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत चालली आहे. मात्र याचा अर्थ कोरोनाच्या जागतिक साथीची चौथी लाट आली असे इतक्यात मानता येणार नाही असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

गुलेरीया यांना मुदतवाढ

कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे, कोरोना राष्ट्रीय कृती गटाचे सदस्य व ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना केंद्र सराकरने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गुलेरिया यांना तूर्त या पदी कायम राहण्यास सांगण्यात आले आहे. गुलेरिया यांचे उत्तराधिकारी कोण असणार याबाबत तीन नावांची चर्चा आहे. ‘एम्स’च्यावतीने तीन ज्येष्ठ डॉक्टरांची शिफारस करण्यात आली आहे. एंडोक्राइनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निखिल टंडन, ‘ट्रॉमा सेंटर’चे व ऑर्थोपेडीक्स विभागाचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा व गैस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद गर्ग यांची नावे ‘एम्स’ने पाठविली आहे. त्यातून अंतिम निवड केंद्रातर्फे करण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com