Appsaheb Kalbhor : अंजीर उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी काळभोर

अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघाची संचालक मंडळ सभा नुकतीच सासवड येथील राधनाथ स्वामी एजन्सी येथे झाली.
Appsaheb Kalbhor
Appsaheb Kalbhor Agrowon

पुणे : अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघाची (All Maharashtra Fig Growers Amendment Sanghachi) संचालक मंडळ सभा नुकतीच सासवड येथील राधनाथ स्वामी एजन्सी (Radhnath Swami Agency) येथे झाली. या वेळी अप्पासाहेब काळभोर (Appsabh Kalbhor) यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Appsaheb Kalbhor
Crop Sowing : सव्वातीन लाख खातेदारांनी केली पीकपेरा नोंदणी

निवडीचा प्रस्ताव रामचंद्र खेडेकर यांनी मांडला. तर प्रदीप पोमण यांनी अनुमोदन दिले. संघाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नवलाखा यांना आजारपणामुळे संघाच्या कामकाजाकडे लक्ष देणे शक्य नसल्याने ही निवड करण्यात आली.

या वेळी संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिव दिलीप जाधव, खजिनदार प्रदीप पोमण, संचालक दत्तात्रेय घुले, अशोक बोराडे, सुशीलकुमार जाधव, दीपक जगताप, सागर काळे, समीर डोंबे, समिल इंगळे, तुळशीराम पांगारे, महादेव टिळेकर उपस्थित होते.

काळभोर म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक शेतकरी अंजीर पिकांकडे वळत आहेत. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अंजीर उत्पादक शेतकरी आहेत. यामध्ये सासवड हे प्रमुख आगार आहे. बाजारपेठेच्या उपलब्धतेसाठी नवीन वाण, लागवडीच्या क्षेत्रात वाढ, संशोधन, प्रक्रियावर भर देऊन परदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी शासनाची मदत घेतली जाईल.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com