APMC Election : बाजार समित्या निवडणुकांचा नवा कार्यक्रम पंधरवाड्यात

उच्च न्यायालयाने बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सुकर केला आहे. प्राधिकरण आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon

अमरावती : उच्च न्यायालयाने बाजार समितीच्या निवडणुका (APMC Election) घेण्याचा मार्ग सुकर केला आहे. प्राधिकरण आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. प्राधिकरणाच्या नव्या कार्यक्रमाकडे सहकारातील (Cooperative Sector) धुरिणांचे लक्ष लागले आहे. येत्या पंधरवाड्यात नवा कार्यक्रम (APMC Election Program) जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

APMC Election
Mumbai APMC : मुंबई बाजार समिती सभापतिपदी शिंदे गटाचे प्रभू पाटील?

न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिल पूर्वी निवडणुका घेण्याचे बंधन असल्याने त्यापूर्वी सहकार विभागाला ग्रामपंचायत संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याची किचकट प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

यामध्ये नवीन सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दहा बाजार समितींमध्ये ५९५५ सदस्य या मतदार संघात असून, त्यांची नावे नवीन मतदार यादीत समाविष्ट केल्या जाणार आहेत.

APMC Election
Mumbai APMC: मुंबई बाजार समिती काबीज करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनसुब्यांना भाजपाकडुनच सुरूंग

ग्रामपंचायत सदस्यांसाठी अर्हता दिनांक निश्‍चित करण्यात येणार असून, तो साधारणतः निवडणुकांचा निकाल जाहीर झाला तो राहणार आहे.

सेवा सहकारी संस्थांच्याही काही नवनिर्वाचित सदस्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे. तर व्यापारी अडते मतदार संघातील मतदार कमी होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेकरिता लागणारा कालावधी बघता निवडणुका एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहात होण्याची शक्यता आहे.

५,९५५ सदस्य बनणार मतदार

जिल्ह्यातील दहा बाजार समितींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांची संख्या ५९५५ आहे. यातील काही सदस्य पुन्हा निवडून आले असले, तरी बहुतांश सदस्य नवीन आहेत. त्यांना मताधिकार मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सेवा

सहकारी संस्था मतदार संघ बाजार समितीच्या संचालक मंडळात आता शेतकरी संचालक राहणार आहे. या संचालकांसाठी कोणता मतदार संघ राहील, असा प्रश्‍न असून त्यांना सेवा सहकारी संस्था मतदार संघातून उमेदवारी दिल्या जाणार असल्याचे सहकार क्षेत्रातील सूर आहे.

या मतदार संघातून उमेदवारीसाठी सूचक व अनुमोदक मतदार यादीतील असावा असे बंधन आहे. लवकरच यासाठी नियमांत सुधारणा करण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com