खरिपासाठी पुढील पंधरवडा महत्वाचा

सोयाबीन, कापसाच्या लागवडी कमी पावसावर सुरु
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

पुणेः देशातील अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस (Rain) झाला नाही. परंतु पडलेल्या पावसावर काही भागांत पेरण्या (Sowing) झाल्या. सध्या सोयाबीन, कापूस आणि भाताच्या लागवडीने (Soybean Cotton Sowing) वेग घेतला. देशात आत्तापर्यंत जवळपास ८५ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा (Kharif Sowing) झाला. तर पुढील पंधरवाड्यात पाऊस कसा होतो यावर सगळं अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

आत्तापर्यंत देशाच्या निम्म्यापेक्षा अधिक भागांत माॅन्सून दाखल झाला. परंतु सार्वत्रिक असा पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे सध्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मागील हंगामातील कापूस आणि सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने यंदाही शेतकरी या पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली. तर हरियाना आणि पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी सिंचनावर शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. तसेच पश्चिम बंगाल आणि हरियानात माॅन्सूनपूर्व पावसावर भाताच्या लागवडी सुरु केल्या.

पावसाला विलंब झाला तरी आजही सोयाबीन पेरणीसाठी योग्य कालावधी आहे. मात्र महत्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रेदशात आत्तापर्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन पेरण्या खोळंबल्या. परंतु आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनची लागवड करू शकतो. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत पाऊस कसा होतो, यानुसार या दोन्ही राज्यांमध्ये पेरण्या वेग घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात खरिपाची जवळपास ८५ लाख हेक्टरवर पेरणी झाली. ही लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. चालू हंगामात कापासाला चांगला दर मिळाला. त्यामुळे चालू खरिपात देशातील कापूस लागवड १२ ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.

गुजरातमध्ये कापूस लागवड १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात कापसाच्या लागवडी माॅन्सूनपूर्व होतात. येथील शेतकरी पाटाचे पाणी किंवा इतर सिंचन स्त्रोतांवर कापूस लागवड करतात. परंतु यंदा अनेक भागांत पाटाचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे कापूस लागवडी धीम्या गतीने झाली. तर हरियानात अनेक भागांत माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडी सुरु केल्या. पश्चिम बंगालमध्येही पाऊस झाला. येथील शेतकरीही भात लागवडीत सध्या व्यस्त आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com