Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर २७ ला होणार सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले होते. निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी सुरू करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र घटनापीठाने ती फेटाळून लावली.
Supreme Court
Supreme CourtAgrowon

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेच्या चिन्हाबाबत (Shivsena Symbol) निवडणूक आयोगाने (Election Commission) तोपर्यंत कुठलाही निर्णय घेऊन नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी (ता. ७) दिले.

Supreme Court
Cotton Boll Worm : कापूस पट्ट्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले होते. निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी सुरू करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र घटनापीठाने ती फेटाळून लावली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याची मागणी केली. आगामी निवडणुका लक्षात घेता तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याबाबत सुनावणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी केली. मात्र आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असल्याने त्यावर निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

Supreme Court
Soybean Rate : वाशीममध्ये नवीन सोयाबीन ५७०० रुपये प्रतिक्विंटल

शिंदे गटातर्फे नीरज कौल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे या बाबत निर्णय घेतला जावा, असे मत मांडले. दोन्ही बाजूंच्या विधिज्ञांना आपले म्हणणे लिखित स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले.

शिंदे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही

शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात चिन्हाच्या सुनावणीबाबत याचिका दाखल केली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका तातडीने सुनावणीला घेण्यात आली नाही. या बाबतचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी होणार का, याकडे आता शिंदे गटाचे लक्ष लागले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com