Fertilizer : रब्बीसाठी नऊ लाख टन खतांची मागणी

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यंदाच्या रब्बी हंगामाकरिता ९ लाख ४३ हजार ६५५ टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.
Fertilizer
Fertilizer Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यंदाच्या रब्बी हंगामाकरिता (Rabi Season) ९ लाख ४३ हजार ६५५ टन रासायनिक खताची मागणी (Fertilizer Demand) करण्यात आली आहे. त्याला अनुसरून ६ लाख २९ ९६१ टन युरिया (Urea), डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी आदी खतांचे आवंटन (Fertilizer Allocation) मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून (Agriculture Department) देण्यात आली.

लातूर कृषी विभागाच्या माहितीनुसार या विभागाअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांसाठी ५ लाख ४० हजार २४९ रासायनिक खताची मागणी करण्यात आली. तर ३ लाख ३५ हजार ५३१ टन रासायनिक खताचे आवंटन पाचही जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले.

Fertilizer
Fertilizer import : भारत १५ लाख टन पोटॅशची आयात करणार

३० सप्टेंबर २०२२ अखेर विभागातील पाचही जिल्ह्यात एक लाख ७२ हजार ६०१ टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक होता ऑक्टोबर २०२२ अखेर ५०३३६ टन आवंटन मंजूर करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसापर्यंत पाचही जिल्ह्यात १ लाख ७०,१२७ टन रासायनिक खतसाठा उपलब्ध होता.

Fertilizer
Fertilizer Rate : खताची किंमत कमी करण्याचा निर्णय रातोरात रद्द

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत जालना, बीड व औरंगाबाद या तीन जिल्ह्यांसाठी ४ लाख ३ हजार ४०६ टन विविध प्रकारच्या रासायनिक खतांची मागणी करण्यात आली. या मागणीला अनुसरून तीनही जिल्ह्यांसाठी २ लाख ९४ हजार ४३० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले.

लातूर विभाग खत, मागणी, मंजूर आवंटन(टनात)

खत प्रकार मागणी मंजूर आवंटन

युरिया १५३६८० १०८५१०

डीएपी १०४५०० ४९१७१

एमओपी ४६९९७ १४८७१

एनपिके १७३३७२ १०५९९१

एसएसपी ६१७०० ५६९८८

औरंगाबाद विभाग खत, मागणी, मंजूर आवंटन (टनात)

खत प्रकार मागणी मंजूर आवंटन

युरिया १३३४३२ ९५७२०

डीएपी ५४१२२ २२८९०

एमओपी २४१४१ ९२५०

एनपिके १६९९७४ ११४८४०

एसएसपी २१७३७ ५१७३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com