‘डॉक्टर ऑफ सायन्स’ने नितीन गडकरी यांचा सन्मान

शेती क्षेत्रासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते देण्यात आली.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

अकोला ः शेती क्षेत्रासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे (Dr. Panjabrao Deshmkh Agriculture University) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते देण्यात आली.

Nitin Gadkari
 गड-किल्ले संवर्धनासाठी  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती 

या संदर्भात बुधवारी (ता. ६) घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी घोषणा केली होती. गडकरी यांनी कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या पुढाकाराने विद्यापीठ्याच्या प्रक्षेत्रावर महाकाय शेततळे उभारण्यात आले. यामुळे पाणी पातळी वाढून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सिंचनात वाढ होण्यास मदत झाली. गडकरी यांनी शेती क्षेत्रासाठी नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत. एकूणच त्यांच्या कामाची दखल घेऊन ही पदवी दिली जात असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले होते.

गुरुवारी (ता.७) झालेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात श्री. गडकरी यांना ही मानद पदवी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले, माजी कुलगुरू मोतीलाल मदान, डॉ. सुरेंद्र काळबांडे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com