Rural School : निजामकालीन शाळांची दुरुस्ती सुरू

८१ शाळांमधील १७३ वर्गखोल्यांची मोठी बांधकामे मंजूर आहेत. त्यापैकी ५३ वर्गखोल्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.
School
School Agrowon

Nizam Era School Aurangabad : राजमाता जिजाऊ शैक्षणिक (Education) गुणवत्ता विकास अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील निजामकालीन माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या नवीन बांधकाम (School Renuvation) सुरू आहे; मात्र, अल्पनिधीमुळे आदर्श शाळांची (Ideal School_ कामे रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात ८१ शाळांमधील १७३ वर्गखोल्या पुनर्बांधणी कामे व १३० शाळांमधील दुरुस्ती कामासाठी राज्य शासनाने प्राथमिक स्वरूपात मोठ्या बांधकामासाठी ८ कोटी ८७ लाख तर छोट्या कामासाठी ३ कोटी ३८ लाख १५ हजार असे एकूण ११ कोटी ५७ लाख ६९ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे.

जिल्ह्यातील ८१ शाळांमधील १७३ वर्गखोल्यांची मोठी बांधकामे मंजूर आहेत. त्यापैकी ५३ वर्गखोल्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. यासाठी २० टक्के लोकसहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे.

School
Girls Education : काळोखाला दूर सारू, सावित्रीच्या लेकी आम्ही!

त्यानंतर जिल्‍ह्यात वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १३० पैकी ४९ शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५ शाळांमध्ये वर्गखोल्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. या लहान-मोठ्या कामांसाठी शासनाकडून ११ कोटी ५७ लाख प्राप्त झाले आहेत.

School
Rural Education : प्लॅस्टिक तराफ्यातून शाळेचा प्रवास

त्या शाळांसाठी केवळ २ कोटी ९७ लाख

राज्य शासनाने शासकीय शाळांच्या सक्षमीकरणाअंतर्गत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील १७ शाळा आदर्श करण्यात येणार आहेत. यात मनपाच्या दोन; तर जिल्हा परिषदेच्या १५ शाळांचा समावेश आहे.

प्रत्येक शाळेला ३३ लाख १९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. या १७ शाळा आदर्श करण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला २० कोटी ९७ लाख रुपये देण्यात येणार आहे. मात्र, दोन वर्षे झाले तरी जिल्ह्याला आत्तापर्यंत केवळ २ कोटी ९७ लाख प्राप्त झाले आहेत. त्यातून केवळ एका शाळेचे काम सुरू आहे. अल्पनिधीमुळे इतर सर्व शाळांची बांधकामे रखडली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com