Forest Management Committee
Forest Management CommitteeAgrowon

Forest Management : वेळासच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीला प्रथम क्रमांक

संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून वेळास येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.

रत्नागिरी ः संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून वेळास येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला (Forest Management Committee) प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. त्यांना ५१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

वने व वन्यजीव यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संत तुकाराम वनग्राम पुरस्कार दरवर्षी दिला जातो. संयुक्त वनव्यवस्थापनाच्या माध्यमातून वनांचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड वन क्षेत्रातील अतिक्रमण वन वणवा अवैध चराई आदी वन गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे यासह ग्रामीण जनतेत जागृती करण्याच्या उद्देशाने वनव्यवस्थापन समित्यांनी कामे करणे आवश्यक आहे.

Forest Management Committee
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

या समितीने केलेल्या कामांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यात २०२१-२२ करिता एकूण सात समित्या सहभागी झाल्या होत्या. जिल्हास्तरावरील समितीत त्याची पडताळणी करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विभाग, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण आणि स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी यांचा अंतर्भाव असून विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) हे सदस्य सचिव आहेत. .

त्यांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २०२१-२२ मध्ये वेळास (ता. मंडणगड) प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना रोख ५१ हजार रुपये पारितोषिक, कोंगाळे (ता. दापोली) द्वितीय क्रमांक रोख रक्कम ३१ हजार रुपये तर तृतीय क्रमांक घेरारसाळगड (ता. खेड) यांना जाहीर झाला असून रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या समितीचा प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com