दारू नको, रोजगाराभिमुख शिक्षण द्या

अमरावती जिल्हा दारूमुक्त करण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानात मोझरी व परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत दारू नको, रोजगाराभिमुख शिक्षण द्या, असा नारा बुलंद केला.
 Crop Damage
Crop DamageAgrowon

मोझरी, अमरावती : अमरावती जिल्हा दारूमुक्त करण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (Drought Affected Farmer) तातडीने मदत जाहीर करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानात मोझरी व परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत दारू नको, रोजगाराभिमुख शिक्षण (Employment Oriented Education) द्या, असा नारा बुलंद केला.

 Crop Damage
Sugar Export : उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी साखर निर्यात वेगाने करावी

विद्यार्थ्यांनी श्रीगुरुदेव अद्यात्म गुरुकुल परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती महाअभियानाच्या वतीने राष्ट्रसंत, गाडगे महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांची कर्मभूमी असलेला अमरावती जिल्हा दारू मुक्त करणे व दुष्काळी जाहीर करण्याचे अभियान शेतकरी बचाओ आंदोलन आणि दारू मुक्ती आंदोलनाचे प्रमुख भाई रजनीकांत व प्रा. सुशील निमकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.

 Crop Damage
Tribal Farmer : आदिवासी मूळचा मालक असूनही भूमिहीन शेतकरी

महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यात व राज्यात मुक्त दारूचे व आता तर मॉल व किराणा दुकानात वाइन विक्री करण्याचे धोरण जाहीर केले. विद्यार्थी, युवक ही राष्ट्रशक्ती आहे, त्यांना रोजगारप्रधान शिक्षण देण्याची गरज असताना व्यसनाधीन होण्याचे अहितकारी कार्य सरकार करीत आहे.

ग्रामीण भागातील २० पटसंख्येच्या शाळा बंद करणार आहेत. या आंदोलनात परिसरातील १० गावातील सुमारे १०० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. दारू नको, चांगले रोजगारयुक्त शिक्षण पाहिजे, किराणा दुकानात वाइन नको, गावात दूध डेअरी

काढा, शेतकरी वाचवा देश वाचवा, ओला दुष्काळ जाहीर करा, दारू मुक्त गाव कौन करेंगा, हम करेंगे, हम करेंगे आदी घोषणांनी गुरुकुल परिसर निनादून गेला. प्रा. सुशील निमकर या अभियानात विद्यार्थ्यांसह सहभागी झाले.मोझरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे, धोत्रा येथील सरपंच भूषण गाठे यांनी या परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागाने तुकडोजी महाराज दारू मुक्तीचा प्रचार, अभियान राबविण्याचा संकल्प केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com