
अमरावती : आमच्या गावात एकही बालविवाह (Child Marriage) होणार नाही, अशा प्रकारचा ठराव अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) पारित केला जाणार आहे. शिवाय सरपंचांसह सर्व गावकऱ्यांना बालविवाह टाळण्यासाठी जागरूक केले जाणार आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी एका नवीन उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहाच्या घटना उजेडात आल्या आहेत. अशा घटनांना आळा बसावा तसेच बालविवाहमुक्त जिल्हा व्हावा, यासाठी खास अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा एकत्र आल्या आहेत.
बालविवाहमुक्त जिल्हा अभियान जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. बालविवाहमुक्त जिल्हा अभियान राबविण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्षण, महिला बालविकास, पोलिस, आरोग्य तसेच ग्रामविकास विभागातील कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना सुद्धा समुपदेशन केले जाणार आहे.
बालविवाहमुक्त जिल्हा हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा, तालुका तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव बालविवाहमुक्त गाव म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.
तीन महिन्यात रोखले १२ बालविवाह
मागील तीन महिन्यांच्या कालावधीत चाइल्डलाइनच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात १२ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. ही एकप्रकारे जागृतीचा परिणाम असल्याचे चाइल्डलाइनचे स्थानिक संचालक डॉ. नितीन काळे व केंद्र संचालक शंकर वाघमारे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.