निधी वाटपात कधीही दुजाभाव नाही: पवार

माध्यमांसमोर सांगण्यापेक्षा त्या-त्यावेळीच तक्रारी केल्या असत्या तर प्रश्न सुटले असते. सध्याच्या परिस्थितीत अशी जाहीर वक्तव्ये टाळायला हवीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
निधी वाटपात कधीही दुजाभाव नाही: पवार
Ajit pawarAgrowon

वृत्तसंस्था

मुंबई : आमच्या काही मित्रपक्षाच्या नेत्यांनी माध्यमांसमोर असे का सांगितले ते माहीत नाही. माध्यमांसमोर सांगण्यापेक्षा त्या-त्यावेळीच तक्रारी केल्या असत्या तर प्रश्न सुटले असते. सध्याच्या परिस्थितीत अशी जाहीर वक्तव्ये टाळायला हवीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णतः शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यात अंतर्गत नाराजीचा प्रश्न सुरु आहे. त्याबाबत तेच अधिकारवाणीने सांगू शकतील, आपण बोलणे उचित नाही, असे अजित पवार म्हणाले. घरात भांड्याला भांड लागतं, तसाच हा प्रकार आहे. शिवसेनेत आजवर जेवढी बंड झाले त्यात नेते बाहेर पडले, सर्वसामान्य शिवसैनिक सोडून गेला नाही, असेही पवार म्हणाले.

Ajit pawar
शिंदे गट उद्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांना पाठवणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे भाजपची भूमिका आहे का? या प्रश्नावर अजित पवार यांनी सध्या तरी वाटत नसल्याचे सांगितले. दरम्यान अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपांबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी, "अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या, असे आरोप केले. त्यानंतर आपण शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीचा भूमिका स्पष्ट केली असल्याचेही त्यांनी म्हटले.

गेल्या अडीच वर्षांत विकासकामांबाबत आपण कधीच दुजाभाव केलेला नाही. सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या विकासासाठी कामे केलेली आहेत, हे लोकांना ठाऊक आहे. मात्र आमच्या मित्रपक्षाने असे आरोप का केले ते माहीत नसल्याचे सांगताना, अशा परिस्थितीत जाहीर बोलणे योग्य नसल्याचेही अजित पवार म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com