Crop Damage Compensation : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे (Crop Damage Survey) करा. पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याअभावी मदतीपासून (Crop Damage Compensation) वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्या.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे (Heavy Rain Crop Damage) नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. श्री सत्तार म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे.

नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील. औरंगाबाद तालुक्यातील दुधड, लाडसावंगी, शेकटा, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर, लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी, पानशेंद्रा, अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाडळसिंगी, जप्ती पारगाव गावातील शिवार परिसरातील बांधांवर जाऊन मंत्री सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : सरकारला मदत द्यायला भाग पाडू ः दानवे

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे विशेषतः परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषिमंत्री म्हणाले, कृषिमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : आता तरी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा

पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल.

माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार नारायण कुचे, बीड जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, कृषी सह संचालक दिनकरराव जाधव, औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, भाऊसाहेब घुगे, अभिमन्यू खोतकर, जालना उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पंडीतराव भुतेकर, विजय दावनगावकर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com