GM Rice-भारतात जीएम भात नाहीः कृषिमंत्री तोमर

भारतात जनुकीय सुधारित (GM) वाणाचा भात पिकवण्यास मनाई आहे. जागतिक मान्यताप्राप्त तपासणी यंत्रणांकडून संबंधित मालाची तपासणी करण्यात आली
GM Rice
GM RiceAgrowon

भारताने कधीही जनुकीय सुधारित भाताच्या (GM Rice) व्यावसायिक लागवडीस संमती दिलेली नाही. तसेच भारताने तसा तांदूळही कधी निर्यात केलेला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी मंगळवारी ( ता. १९) लोकसभेत दिली.

२०२१ मध्ये युरोपियन युनियनला जनुकीय सुधारित (GM) तांदूळ निर्यात केला होता का, असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला. त्याला कृषिमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. २१ जून २०२१ रोजी सीमा परिसरातून अनधिकृतपणे जनुकीय सुधारित तांदूळ निर्यातीचा प्रयत्न झाल्याची एक तक्रार आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात आली.

GM Rice
Rice Prices: देशभरात तांदळाच्या किंमतीत वाढ

भारतात जनुकीय सुधारित (GM) वाणाचा भात पिकवण्यास मनाई आहे. जागतिक मान्यताप्राप्त तपासणी यंत्रणांकडून संबंधित मालाची तपासणी करण्यात आली. हा माल जनुकीय सुधारित नसल्याचे संबंधित यंत्रणांकडून प्रमाणित करण्यात आले होता, असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

भारत सरकारने यासंदर्भात ऑक्टोबर २०२१ मध्ये फ्रान्स आणि युरोपियन युनियनकडे चिंता व्यक्त केल्याचेही तोमर यांनी सांगितले. देशात जनुकीय सुधारित वाणाचा भात घेतला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे असताना या प्रकरणात भारताचे नाव गोवले गेल्याबद्दलची नाराजीही भारत सरकारने संबंधित देशांच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केली होती.

GM Rice
Potato Arrival : नगर बाजार समितीत बटाट्याची विक्रमी आवक

भारतातून निर्यात केलेल्या तांदळातील भेसळ ही नंतरच्या टप्प्यात झाली असावी. युरोपियन युनियनमध्ये तुकडा तांदळावरील (Broken Rice) प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. कदाचित भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नांतून हे घडले असल्याची शक्यता आहे, असेही तोमर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com