Pomogranate Export
Pomogranate ExportAgrowon

Pomegranate Export : बांगलादेशकडून ‘एलसी’ मिळेना, डाळिंबाच्या निर्यातीत अडथळे

पैशाच्या चणचणीचे कारण; डाळिंबासह अन्य फळांची निर्यातही रोडावणार

सुदर्शन सुतार ः अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः श्रीलंकेपाठोपाठ आता बांगलादेशातही पैशाची चणचण भासू लागली आहे. मुख्यतः भारतीय निर्यातदारांना बांगलादेशकडून आवश्यक असणारे लेटर ऑफ क्रेडीट (एलसी) (Letter Of Credit) मिळण्यात अडचण येत आहे. परिणामी, सध्या बांगलादेशातील डाळिंबाच्या निर्यातीला (Pomogranate Export) त्याचा मोठा फटका बसत आहे. या कालावधीत दरवर्षी डाळिंबाची प्रतिदिन २५० ते ३०० टनांवर होणारी निर्यात, आज अवघ्या ६० टनांवर आली आहे.

 Pomogranate Export
Pomegranate Export : नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब निर्यातीत ‘खोडा’

जगभरातील आघाडीवरचा डाळिंब देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतात सर्वाधिक दोन लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारताचा डाळिंबाच्या निर्यातीतला हिस्साही मोठा आहे. जगभरातील ३० हून अधिक देशात भारतीय डाळिंबाची निर्यात होते. स्पेन, इराण, टर्की, इजिप्त हे काही देश भारताचे डाळिंब उत्पादनातील स्पर्धक आहेत. पण तरीही जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. त्यात युरोपसह अरब अमिराती, कतार, नेदरलँण्ड आणि बांगलादेश या बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत. युरोपनंतर बांगलादेश ही भारतासाठी अगदी जवळची आणि हुकमी बाजारपेठ आहे. परंतु सध्या युरोपमध्ये अन्य देशांतील डाळिंबाची मोठी आवक होत असल्याने भारताला बांगलादेशची बाजारपेठ सोईची आहे.

 Pomogranate Export
Pomegranate Farming : डाळिंबातून फुलले दुष्काळी गावाचे अर्थकारण

शिवाय पहिल्या प्रतिसह दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबालाही मोठा उठाव तिथे मिळतो. त्यामुळे बांगलादेशची बाजारपेठ महत्त्वाची समजली जाते. पण श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशातही पैशाची चणचण निर्माण झाल्याने बांगलादेशाने काही महत्त्वाच्या आणि गरजेच्या वस्तूंशिवाय अन्य वस्तूंच्या निर्यातीवर रोख लावला आहे. त्यामुळेच बांगलादेशकडून निर्यातीसाठी आवश्यक असणारे लेटर ऑफ क्रेडीट (एलसी) मिळण्यात अडचण येत आहे. सध्या काही ठराविक टनेजची मागणी तिकडून नोंदवली जाते आणि तेवढ्याच टनेजला एलसी मिळते, अशी परिस्थिती आहे. सध्या डाळिंबाच्या निर्यातीत अडथळे येत आहेत. पुढे द्राक्ष हंगामात द्राक्ष निर्यातीलाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 Pomogranate Export
Pomegranate Farming : शेतकरी नियोजन : डाळिंब


दर चांगले, निर्यात रोडावली
सध्या बांगलादेशमध्ये डाळिंबाला प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर आहे. भारतातील देशांतर्गत बाजारापेक्षाही जवळपास दुप्पटीने तिथे दर आहे. पण बांगलादेशातील परिस्थितीचा परिणाम या सगळ्यांवर झाला आहे. दरवर्षी या कालावधीत साधारण नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत बांगलादेशात रोज अडीचशे ते तीनशे टनांपर्यंत डाळिंबाची निर्यात होते, आज ती अवघ्या ६० टनांवर आली आहे.


काही निर्यातदारांची मक्तेदारी

बांगलादेशला निर्यात करणाऱ्या निर्यातदारांची संख्या अगदी २० ते २५ एवढी अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे. त्यातही बांगलादेशकडून मिळणारे लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) काही ठराविक दोन-चार निर्यातदारांनाच मिळते आहे. त्यामुळे या निर्यातदारांचीच मक्तेदारी यात निर्माण झाली आहे. त्यामुळे अन्य निर्यातदार सरसकट यामध्ये उतरू शकत नाहीत, त्याचाही फटका डाळिंब निर्यातीला बसतो आहे.

श्रीलंकेसारखीच काहीशी परिस्थिती आता बांगलादेशमध्ये निर्माण होते आहे. त्यामुळे डाळिंबाच्या निर्यातीत अडचण येते आहे. शिवाय युरोपमध्येही आपल्याला स्पर्धा आहे. त्यामुळे यंदा देशांतर्गत बाजारावरच अधिक लक्ष केंद्रित करणे सोईचे होईल.
- शीतल चांदणे, निर्यातदार, सांगोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com