खत गैरप्रकार नियंत्रणासाठी आता नोडल अधिकारी

शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये व साठेबाजी रोखता यावी, याकरिता यंदा प्रथमच नोडल अधिकारी नियुक्‍तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Fertilizer Distribution
Fertilizer DistributionAgrowon

अमरावतीः खत वितरणातील गैरप्रकार व गळती रोखण्याच्या उद्देशाने कंपनीपासून निघाल्यानंतर ते वितरकांपर्यंत पोहचेपर्यंत नोडल अधिकारी नियुक्‍त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्‍यात पंडा यांनी दिलेल्या आदेशानंतर कृषी विभागाने अंमलबजावणीवर भर दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या हंगामात देशांतर्गंत खतटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती वर्तविली जात आहे. खताची उपलब्धता कमी होणार असल्याने त्यातूनच खत वितरणात गैरप्रकारही वाढीस लागतील. परिणामी वाद-विवादही वाढणार आहेत. या सर्व प्रकाराची जाण ठेवत पंडा यांनी कृषी विभागाला वेळीच सर्वप्रकारच्या उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये व साठेबाजी रोखता यावी, याकरिता यंदा प्रथमच नोडल अधिकारी नियुक्‍तीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात धामणगाव तसेच बडनेरा रेक पॉइंटवर कंपन्यांव्दारे खताचा पुरवठा होतो. या विषयी कंपनी स्तरावरून कृषी विभागाला माहिती देण्यात येते. तालुक्‍याला खताचा साठा पुरविण्यात आला आहे का? या दरम्यान कुठे वाहतुकीची समस्या आली का? याची माहिती व आलेली अडचण सोडविण्यासाठी मोहीम अधिकारी एल.जी. आडे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे,’’ अशी माहिती कृषी विकास अधिकारी गोपाल देशमुख यांनी दिली.

खरीप हंगामात बियाणे व रासायनिक खतांचा पुरवठा, वितरण, काळाबाजार रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्राच्या तपासणीवरही भर दिला गेला आहे. प्रत्येक तालुक्‍यात एक या प्रमाणे १४ व जिल्ह्याचा एक अशा १५ भरारी पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यासोबतच १५ ठिकाणी तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com