मदतनिधी वाटपामध्ये ग्रामसेवकांचा असहकार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
Crop Damage
Crop DamageAgrowon

यवतमाळ : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी वाटपाचा गोंधळ अजूनही दूर झालेला नाही. तलाठ्यांनी बहिष्कार घातल्यानंतर त्यावर तोडगा निघाला. त्यानंतर कृषी सहायक (Agril. Assistent) संघटनेने आंदोलन छेडले होते. तलाठी, कृषी सहायकांनी काम सुरू केल्यानंतर आता ग्रामसेवक संघटनेने मदतवाटप कामावर बहिष्कार घातला आहे.

Crop Damage
कोकणातील शेतकऱ्यांची दिवाळी शेतात

जुलै, ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने पन्नास टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने जुलै ते ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात ५२९ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ५१ कोटींहून अधिक रुपयांचा निधी पाठविला आहे. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तलाठी संघटनेने मदतनिधी वाटप कामावर बहिष्कार टाकला. यावर विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली. त्या वेळी तलाठी, कृषी सहाय्यक तसेच ग्रामसेवक यांना समान गावे वाटप करण्यावर तोडगा निघाला. हे होत नाही तोच कृषी सहायक संघटनेने आंदोलन केले. तोडगा निघाल्यानंतर त्यांनीही कामाला सुरुवात केली आहे. मात्र आता ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार घातला आहे.

Crop Damage
Soybean Crop Damage : सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र हतबलतेच्या विळाख्यात | ॲग्रोवन

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढीत नऊ ऑक्टोबरपर्यंतच याद्या मागितल्या होत्या. मात्र अजूनही ग्रामसेवक संघटनेने कामाला सुरुवात केलेली नाही. परिणामी, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबत शाश्‍वती नाही. महिन्याभरापासून निधी प्राप्त झाला, परंतु वेगवेगळ्या संघटनेच्या आंदोलनाने अजूनही शेतकऱ्यांपर्यंत निधी वितरित झालेला नाही. दिवाळीपूर्वी १४ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करावा, असा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अद्याप याद्याच अंतिम झाले नसल्याने शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना निधी मिळावा असा प्रयत्न आहे. मदतनिधी वाटपांचे काम करावेच लागणार आहे. तलाठी तसेच कृषी सहायकांनी काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनाही याद्या द्याव्याच लागतील. कर्तव्यात कसूर केल्यास निश्‍चितच प्रशासकीय कारवाईला समोर जावे लागेल.
-अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com