Rain Update : ढगफुटीसदृश पावसामुळे दाणादाण

पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता.११) सायंकाळी विविध ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे दाणादाण उडाली. पारगाव (ता. आंबेगाव) येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला. तर, फूलउत्पादक पट्ट्यात झालेल्या पावसामुळे फुले भिजल्याने मोठे नुकसान झाले.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता.११) सायंकाळी विविध ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे (Rain Like Cloudburst) दाणादाण उडाली. पारगाव (ता. आंबेगाव) येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला. तर, फूलउत्पादक पट्ट्यात झालेल्या पावसामुळे फुले भिजल्याने मोठे नुकसान (Flower Damage) झाले.

Rain Update
Rain Update : तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

मंचरसह आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, खडकवाडी व धामणी परिसरात रविवार (ता.११) सायंकाळी ढगफुटी होऊन सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर धामणी येथील गवंडीमळ्यात वीज पडून बैलगाडा शर्यतीचा एक बैल मृत्यूमुखी पडला.

Rain Update
Rainfall : राज्यात ऑगस्टअखेर १८ टक्के अधिक पावसाची नोंद

धामणी परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लोणीच्या डोंगरभाग तसेच धामणीच्या धनगरदरा परिसरात ढगफुटी झाल्याने शेताचे बांध फुटले. धामणी येथील गवंडी मळ्यात नामदेव महादू गवंडी यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळील झाडावर वीज पडल्याने गोठ्यातील शर्यतीचा बैल जागीच ठार झाल्याने गवंडी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शासनाने पंचनामा करून गवंडी यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी सरपंच सागर जाधव यांनी केली आहे.

लोणी गावालगत पारगाव लोणी रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने या रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले होते. मोटारसायकलवरून चाललेला तरुण पुराच्या पाण्यात अडकला व पुराबरोबर मोटारसायकलसह वाहत चालला असता तरुणांनी तत्परता दाखवून त्याला पुराच्या बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.

पिरंगुट, लवळे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काकडी, सोयाबीन तसेच अन्य पिकांचे नुकसान झाले. प्रतीक क्षीरसागर यांच्या राहत्या घरात पाणी घुसल्याने नुकसान झाले. भोसरी आणि मोशी परिसरात विजांच्या कडकडाटासह रविवारी सायंकाळी पाऊस झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com