विकासाकडे नव्हे; विनाशाकडे वाटचाल : अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा

सध्या तर विकासाकडे नव्हे, तर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे, अशी टीका अर्थतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली.
Prof. Deserda
Prof. DeserdaAgrowon

यवतमाळ : ‘‘स्वातंत्र्याच्या (Indian Independence) ७५ वर्षांनंतर देशातील ७५ टक्के जनता आत्यंतिक हालअपेष्टेचे जीवन जगत आहे. यास आजी-माजी राज्य व केंद्र सरकार (Central Government) जबाबदार आहे. गांधी-फुले-आंबेडकरांना अभिप्रेत असा विकास झाला नाही.

Prof. Deserda
Crop Insurance Scheme : खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना

सध्या तर विकासाकडे नव्हे, तर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे,’’ अशी टीका अर्थतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली. येथील सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देसरडा बोलत होते. जनजळवळीचे प्रतिनिधी म्हणून प्रा. देसरडा कन्याकुमारीपासून ते तमिळनाडू, केरळ येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

Prof. Deserda
Sharad Pawar : ग्रामपंचायतीत ‘मविआ’ला सर्वाधिक २७७ जागा ः पवार

पदयात्रेदरम्यान आठ विद्यापीठ व संशोधन संस्थेत त्यांची व्याख्याने झालीत. आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद, पर्यावरणीय विध्वंस या आजच्या प्रमुख तीन समस्या आहेत. हवामान अरिष्ट व महामारीने धोक्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

Prof. Deserda
Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

सौरऊर्जा, जैवऊर्जा ही स्वस्त, शीघ्र व सुरक्षित पर्याय आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या महारस्ते, इथेनॉल व अन्य प्रकल्प हे पूर्णत: अनाठायी विनाशाकडे नेणारे आहेत. यवतमाळसह विदर्भात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

मात्र, उद्योग उभारणीसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. लोकशाही वाचविण्यासाठी प्रस्थापिंतांविरोधात जनतेने एकत्र यावे, असे आवाहनही देसरडा यांनी केले. या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com