Akkalkot : कर्नाटकात जातो म्हणणाऱ्या अक्कलकोटच्या ११ गावांना नोटिसा

समाधानकारक उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा
 Karnataka Border
Karnataka BorderAgrowon


अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात समाविष्ट होण्याचा ठराव केला होता. पण आता ही गावे चांगलीच अडचणीत आली आहेत. या गावांना अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कर्नाटकात समाविष्ट होण्याबाबत केलेल्या ठरावासंबंधी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

 Karnataka Border
Karnataka-Maharashtra border : कर्नाटकात जाण्याचा ठराव घेणाऱ्या ग्रामंपचायतींवर कारवाईचा बडगा

महाराष्ट्रात राहूनही गेल्या ७० वर्षांत सीमेवरील आमच्या गावांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. आम्हाला कोणत्याही मूलभूत सोई-सुविधा मिळाल्या नाहीत, असे सांगत अक्कलकोटमधल्या या ११ गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी आता या गावांना नोटीस पाठविली आहे. या नोटिशीनुसार, महाराष्ट्र सरकार शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा पुरवत आहे. तरीही या संदर्भात ग्रामस्थांचा गैरसमज दूर करून या ठरावांबाबत त्यांना परावृत्त करणे आवश्यक आहे. तरीही ग्रामसभेच्या विषय पत्रिकेत हा विषय घेऊन ठराव पारित करण्यासाठी मदत केल्याबद्दल तुम्हाला जबाबदार धरुन तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

 Karnataka Border
Maharashtra Border Issue : पन्नास वर्षानंतरही सरकारचे दुर्लक्षच!

आधी सुविधा द्या’
या बाबत समाधानकारक खुलासा न केल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे. पण आता या नोटिशीलाही काही गावांनी विरोध करत नोटिशीपेक्षा आधी सुविधा द्या, असे म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com