Crop Insurance : तुरीची २५ टक्के विमा भरपाई देण्यासाठी अधिसूचना जारी

यंदाच्या पावसाळ्यात हिंगोली जिल्ह्यातील १३ मंडलामध्ये १२० टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी तुरीच्या उत्पादनात सरासरीपेक्षा ५० टक्केहून अधिक घट अपेक्षित आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

हिंगोली ः यंदाच्या पावसाळ्यात हिंगोली जिल्ह्यातील १३ मंडलामध्ये १२० टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी तुरीच्या उत्पादनात (Crop Insurance) सरासरीपेक्षा ५० टक्केहून अधिक घट अपेक्षित आहे. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हर्सीटी) या जोखीम बाबीअंतर्गंत विमाधारक शेतकऱ्यांना तुरीच्या एकूण विमा संरक्षित रकमेपैकी २५ टक्के अग्रिम विमा भरपाई रक्कम अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा पीकविमा योजना जिल्हा स्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

Crop Insurance
Crop insurance : विम्याची हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई

त्यासाठी सोमवारी (ता.२८) अधिसूचना जारी केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील ३० पैकी नरसी नामदेव, सिरसम बुद्रक, डिग्रस कऱ्हाळे, माळहिवरा, खंबाळा आखाडा बाळापूर, डोंगरकडा,वारंगा, हयातनगर, कुरुंदा, औंढा नागनाथ, येहळेगांव, साळना या १३ महसूल मंडळांमध्ये संपूर्ण हंगामाच्या १२० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे.

पंतप्रधान पीकविमायोजनेतील मार्गदर्शक सूचनानुसार पर्जन्यमानाच्या २० टक्के पेक्षा कमी अधिक विचलन या निकषाअंतर्गंत या १३ महसूल मंडळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत नुकसान भरपाई या जोखीम बाबीअंतर्गंत विमा संरक्षित रक्कमपैकी २५ टक्के अग्रिम विमा भरपाईस पात्र ठरतात. त्यासाठी १० नोव्हेंबर रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये अधिसूचना काढण्यास मान्यता देण्यात आली.

विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, बाधित क्षेत्रातील शेतकरी यांच्या संयुक्त समितीने महसुल मंडळात यादृच्छीक पद्धतीने नमुना सर्वेक्षणानुसार नजर अंदाजावर आधारित अपेक्षित उत्पादकता ही मागील ७ वर्षातील सरासरी उत्पादकतेपेक्षा ५० टक्के हुन अधिक कमी आल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे या मंडलातील शेतकऱ्यांना संरक्षित विमा रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम एक महिन्याच्या कालावधीत अदा करावी. हंगामाच्या अखेरीस पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित होणारी नुकसान भरपाई यापेक्षा जास्त असेल तर दोन्ही मधील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी आयसीआयसीया लोम्बार्ड जनरलल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.

मंडलनिहाय तूर उत्पादकता स्थिती (प्रतिहेक्टर क्विंटलमध्ये)

मंडल सरासरी उत्पादकता अपेक्षित उत्पादकता उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी

नरसी नामदेव ६.३५ २.६० ५९

सिरसम बुद्रूक ५.९२ २.४८ ५८

डिग्रस कऱ्हाळे ५.७३ २.३५ ५९

माळहिवरा ५.४३ २.१७ ६०

खंबाळा ५.८३ २.४४ ५८

आखाडा बाळापूर ८.४१ ३.३७ ५९

डोंगरकडा ८.३५ ३.३९ ५९

Crop Insurance
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

वारंगा ७.४४ ३.११ ५८

हयातनगर ६.७२ ३.२३ ५१

कुरुंदा ७६७ ३.७८ ५२

औंढा नागनाथ ६.६८ २.७० ५९

येळेगाव ७.३० २.८८ ६०

साळना ५.६८ २.२१ ६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com