NDDB: आता दुधासोबत चक्क शेणही विका

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (एनडीडीबी- NDDB) 'मृदा लिमिटेड' नावाने एक कंपनी सुरू केली आहे. पशुधनाचे शेण, मूत्र यापासून तयार केल्या जाणाऱ्या खतांचे व्यवस्थापन ही कंपनी करणार आहे.
Cow Dung
Cow DungAgrowon

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (National Dairy Development Board) (एनडीडीबी- NDDB) 'मृदा लिमिटेड' (Mruda Limited) नावाने एक कंपनी सुरू केली आहे. पशुधनाचे शेण (Livestock Dung), मूत्र यापासून तयार केल्या जाणाऱ्या खतांचे व्यवस्थापन (fertilizer Management) ही कंपनी करणार आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Parshottam Rupala) यांनी नुकतेच या कंपनीचे उद्घाटन केले.

ही कंपनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या मालकीची उपकंपनी असून देशभरात खत व्यवस्थापन उपक्रमांमध्ये ती काम करणार आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेने साडे नऊ कोटी रूपयांच्या भागभांडवलासह एक जुलै, २०२२ रोजी ही पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आल्याचे एनडीडीबीच्या निवेदनात म्हटले आहे.

Cow Dung
शेणखत वापरताना कोणती काळजी घ्याल?

मृदा लिमिटेड ही कंपनी गायी आणि म्हशींचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुधासोबत शेणही खरेदी करणार आहे. हे शेण वीजनिर्मितीसाठी, गॅस तयार करण्यासाठी तसेच सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री रुपाला म्हणाले की, एनडीडीबीच्या मृदा लिमिटेड कंपनीमुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना शेणाच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होईल. एलपीजीच्या जागी बायोगॅस वापरल्यास शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. तसेच कंपनीच्या खत व्यवस्थापनाच्या प्रयत्नांनाही चालना मिळेल.

Cow Dung
अर्जुनी मोरगावात दोन हजार रुपयांना एक ट्रॉली शेणखत

शेण आधारित खताच्या वापरास प्रोत्साहन दिल्यास रासायनिक खतांच्या जागी सेंद्रिय खतांचा वापर केला केला जाईल. यामुळे भारताचं खत आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास रुपाला यांनी यावेळी व्यक्त केला.

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव कुमार बल्यान म्हणाले की, एनडीडीबी मृदा लिमिटेड ही कंपनी भारतातील पहिलीच अशी कंपनी आहे जी शेणाच्या कार्यक्षम वापरावर लक्ष केंद्रित करणार आहे. यातून खत व्यवस्थापन मूल्य शृंखला तयार होऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल.

"भारतात जे खत व्यवस्थापन उपक्रम राबवले जातात त्यात भारताच्या सध्याच्या एलपीजी वापराच्या ५० टक्के समतुल्य बायोगॅस तयार करण्याची क्षमता आहे. यातून जी बायोस्लरी तयार होईल ती NPK (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश) च्या ४४ टक्के समतुल्य असेल,'' असे राज्यमंत्री राज्यमंत्री एल मुरुगन म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com