Pune ZP Election : आता उत्कंठा आरक्षणाची

पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन ८२ गट आणि पंचायत समित्यांच्या १६४ गणांच्या रचनेवर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शिक्कामोर्तब केले.
Pune ZP Election
Pune ZP ElectionAgrowon

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन ८२ गट आणि पंचायत समित्यांच्या १६४ गणांच्या रचनेवर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी शिक्कामोर्तब केले. यामुळे आता गण आणि गटांचे प्रभागांचे संवर्गनिहाय आरक्षण (Pune ZP Reservation) जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी सोमवारी (ता. २७) गट व गणांची अंतिम रचना प्रसिद्ध केली.

Pune ZP Election
जिल्हा परिषद गणांची रचना सोमवारी होणार जाहीर

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी २ जून २०२२ रोजी गट व गणांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या प्रारूप रचनेबाबत जिल्ह्यातील नागरिकांकडून ८ जून २०२२ पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार १५० हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त राव यांनी १६ जून २०२२ ला सुनावणी घेतली. त्यात त्यांनी प्रत्येक हरकतींबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर २२ जूनपर्यंत हरकतींवर निर्णय घेण्यास विभागीय आयुक्तांना मुदत दिली होती.

Pune ZP Election
पुणे जिल्हा परिषद घेणार फिरती पशू चिकित्सालये

याआधी फेब्रुवारी २०१७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे एकूण ७५ गट आणि १३ पंचायत समित्यांचे मिळून एकूण १६४ गण होते. त्यात आता अनुक्रमे सात गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील २३ गावे पुणे महापालिका हद्दीत गेल्याचा सर्वाधिक फटका हवेली तालुक्याला बसला आहे. नवीन प्रभाग रचनेत या तालुक्यातील तब्बल सात गट आणि १४ गण कमी झाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. या नव्या रचनेत गट आणि गणांची संख्या वाढविण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यामुळे या नव्या रचनेनुसार पूर्वी पुणे जिल्ह्यात ८३ गट आणि १६६ गण निश्‍चित केले होते. परंतु, ही संख्या अंतिम करताना त्यात परत अनुक्रमे एक गट आणि दोन गणांनी संख्या कमी झाली आहे.

संकेतस्थळावरही रचना उपलब्ध

जिल्हा परिषद व गट व गणांच्या अंतिम रचनेत कोणत्या गटात कोणती गावे, वाड्या-वस्त्या आणि गणनिहाय गावांची नावे दिलेली आहेत, ही अंतिम रचना जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये, पंचायत समित्यांचे मुख्यालये, जिल्हा परिषद मुख्यालय आणि जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नागरिकांना आपापल्या तालुक्यात किंवा घरबसल्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही रचना पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेतून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com