
सातारा : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ (Maza Ek Divas Balirajasathi) हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. (Indian Agriculture) या उपक्रमात कृषीसह इतर विभागातील अधिकाऱ्यांनी गावागावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद (Farmer Communication)साधण्यास सुरुवात केली आहे.
राज्यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या, नैराश्य यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे समजून घेणे, त्यासाठी सुलभ व प्रभावी कृषिविषयक धोरण तयार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रशासनाने समजून घेऊन त्यावर उपाययोजना करून निर्णय घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत संवाद साधून येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी हा उपक्रम ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे.
अधिकारी शेतकऱ्यांसोबत विविध विषयांवर संवाद साधत आहेत. या उपक्रमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. कृषिविषयक माहिती मिळेल.
या अधिकाऱ्यांच्यावर तालुकानिहाय जबाबदारी
मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत (खंडाळा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव (फलटण), अर्चना वाघमळे (महाबळेश्वर),
किरण सायमोते (खटाव), रोहिणी ढवळे (जावळी), प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर (पाटण), माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (कोरेगाव), कृषी विकास अधिकारी विजय माईणकर (माण), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे (पाटण), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार (वाई), जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे (सातारा),
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे (कऱ्हाड), लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अरुणकुमार दिलपाक (खंडाळा), कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे (सातारा) यांच्याकडे उपक्रमाची जबाबदारी असेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.