Okra Crop : जळगावात भेंडी पीक क्षेत्र घटले

पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसानंतर भेंडीची काढणी सुरू होईल. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक कमी झाली आहे.
Okra Crop
Okra CropAgrowon

जळगाव ः जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागात भेंडीचे क्षेत्र (Okra Crop) कमी झाले आहे. परिणामी बाजारातील आवक कमी दिसत आहे. दरात वाढ Okra Rate) झाली, परंतु या दरांचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना (Farmer) मिळत नसल्याचे चित्र आहे.

एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक (Bhendi Peak) असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते.

पावसाळ्यातही या भागात भेंडी असते. परंतु सध्या भेंडीची लागवड कमी झाली आहे. ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसानंतर भेंडीची काढणी सुरू होईल. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक कमी झाली आहे.

या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या भेंडीसही २५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. या गावांत एरंडोल, धरणगाव भागातील मोठे खरेदीदार, एजंट भेंडीची खरेदी करीत आहेत.

Okra Crop
Bhendi, Chilli New Variety : अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या मिरची, भेंडी वाणास मान्यता

या भेंडीची पाठवणूक मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, बडोदा येथे केली जात आहे. यामुळे स्थानिक बाजारात भेंडीची आवक कमी आहे.

जळगाव इतर शहरांमधील आठवडी व इतर बाजारांत विक्रेते भेंडीची ६० ते ७० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री करीत आहेत.

जळगाव येथील भाजीपाल्याचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोडसह धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल आदी भागातूनही भाजीपाल्याची आवक होते.

परंतु सध्या भेंडीची आवक निम्म्यावर किंवा त्यापेक्षा कमी आहे. डिसेंबरमध्ये भेंडीची जळगावच्या बाजारात प्रतिदिन सरासरी १७ क्विंटल आवक झाली होती.

या महिन्यात मागील आठ दिवसात ही आवक प्रतिदिन सरासरी ८ क्विंटल एवढीच आहे. यात बुधवार, गुरुवारी ही आवक यापेक्षा कमी राहील्याची नोंद झाली आहे.

भेंडीला ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला. हा दर परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांनी भेंडीचे क्षेत्र रिकामे केले. लागलीच भेंडी लागवडदेखील टाळली. यामुळे हे क्षेत्र घटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com